विकी कौशल पुन्हा नव्या भुमिकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

आता विकी कौशलला भूतानं झपाटलं आहे आणि विकी सुध्दा या भूताला खूप घाबरला आहे! विकीने स्वतः सोशल मिडीयावरुन आपबीती सांगितली आहे.​a

'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटानंतर हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवा हीरो दिला, तो म्हणजे विकी कौशल. पण आता या हिरोला भूतानं झपाटलं आहे आणि विकी सुध्दा या भूताला खूप घाबरला आहे! विकीने स्वतः सोशल मिडीयावरुन आपबीती सांगितली आहे.

विकीची ही भीती त्याच्या खऱ्या आयुष्यातील नसून पडद्यावरील भूतानं त्याला झपाटलं आहे. नुकताच विकीच्या आगामी 'भूत' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरवर विकी एका शिपच्या खिडकीतून बाहेर बघून ओरडत आहे आणि भूताने विकीच्या गळ्याला घट्ट पकडले आहे. विकीने हे पोस्टर ट्विट करत म्हटले आहे की, 'भूत-द हाँन्टेड शिप च्या पहिल्या भागाचे पोस्टर प्रदर्शित करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भानु प्रताप सिंह करत आहे. 15 नोव्हेंबर 2019 ला चित्रपट प्रदर्शित होईल.'

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे. तीन भागात चित्रपट बनणार आहे. याविषयी करण जोहरने सांगितलं आहे की, 'पहिल्यांदाच धर्मा प्रोडक्शन अंतर्गत हॉरर चित्रपट बनत आहे. आम्ही 3 भागात हा चित्रपट बनविणार आहे.'

या चित्रपटात भूमी पेडणेकरची सुध्दा महत्त्वाची भूमिका आहे. 2003 ला अजय देवगण आणि उर्मिला मातोंडकर अभिनित आणि राम गोपाल वर्मा दिग्दर्शित भयपटाचे नावही 'भूत' होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News