पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

नवी दिल्ली : एका महिलेनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क असल्याचा निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिला आहे.

पतीच्या पगारावर कुणीही अवलंबून नसेल तर, पत्नीला पगाराच्या 30 टक्के हिस्सा मिळाला पाहिजे असं आपल्या निर्णयामध्ये म्हटलं आहे. शिवाय, याचिकेवरील सुनावणी दरम्यान पत्नीला पतीच्या पगाराच्या 30 टक्के रक्कम देण्याचा निर्णय देखील यावेळी न्यायालयानं दिला. 

7 मे 2006 रोजी महिलेचं लग्न एका इन्स्पेक्टरशी झालं होतं. त्यानंतर 15 ऑक्टोबर 2006 रोजी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महिलेनं पोटगीसाठी न्यायालयात धाव घेतली. 2008मध्ये महिलेला सर्व प्रथम पोटगी देण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयानं पगारातील 30 टक्के हिस्सा पत्नीला देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला पतीनं न्यायालयात आव्हान दिलं. त्यानंतर सुनावणीदरम्यान ही रक्कम 15 टक्के करण्यात आली. त्यानंतर महिलेनं या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं. यावर निर्णय देताना न्यायालयानं पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क हसल्याचं म्हटलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News