पत्नी म्हणाली... माझ्या पदरात पडलंय खूळं...

महेश बाबुराव घोलप
Friday, 16 August 2019
  • उजव्या बाजूला एक जोडपं बसलं होतं. साधारण चाळिशीतलं असावं... ट्राफिक अधिक असल्यामुळे दोघांच्या मध्ये धुसफूस सुरू होती.
  • पत्नीनं नवऱ्याला इतकं ताब्यात ठेवलं होतं की, पत्नी बोलायला लागली की, नवरा नोकिया मोबाईल प्रमाण थरथरत होता.

पावसाचा अंदाज घेऊन कार्यालयातून बाहेर पडलो, इतका पाऊस पडत होता, की ज्यांच्याकडे छत्री होती. ते सुद्धा पावसाच्या झडपेने भिजत होते. पाच मिनिटाच्या अंतरावरती असलेल्या स्टेशनला पोहचेपर्यंत अंग चिंबाड झालं. तसं तर छत्री असून माझ्या सारखे सगळेच भिजलेले होते. 

नेहमीप्रमाणे लोकल अर्धातास उशिराने स्थानकात दाखल झाली. इतकी गर्दी होती की, ज्यांना शक्य आहे असेच प्रवासी लोकलमध्ये चढले. त्यानंतर धिम्यागतीने प्रवासाला सुरुवात झाली. संपूर्ण लोकल पावसाच्या झडपेने भरून गेली होती. लोक पावसामुळं कमी पण लोकांच्या छत्रीमुळं अधिक ओली झाली होती.

चेंबूर स्थानकात उतरलो, पावसाचा जोर आणखी वाढला होता. पावसाच्या पाण्याने अख्खा रस्ता माखला होता. घुडघाभर पाण्यात इतकं ट्राफिक झालं होतं की, किमान तासभर घरी जायला लागेलं असं वाटू लागलं. शेवटी बसने घरी जायचं ठरवलं. 

बस स्टॉपवरती पोहचल्यानंतर कमी गर्दी दिसली, 20 मिनिटानंतर बस आली. बसमध्ये चढलो, मागच्या सीटच्या इथे उभा राहिलो. विनोदी मास्टर "बोला" "बोला" अस करत पुढे आला. मास्तरच्या ओळखीचा माणूस मास्तरला म्हणाला..."तुम्ही फक्त बायकांशी बोला"... असं म्हणल्यावर पाठीमागे प्रवाशांना जोराचं हसू आलं...

उजव्या बाजूला एक जोडपं बसलं होतं. साधारण चाळिशीतलं असावं...बहुतेक घाटकोपर वरून आलं असावं.  ट्राफिक अधिक असल्यामुळे दोघांच्या मध्ये धुसफूस सुरू होती. पत्नीनं नवऱ्याला इतकं ताब्यात ठेवलं होतं की, पत्नी बोलायला लागली की, नवरा नोकिया मोबाईल प्रमाण थरथरत होता. ही मजा उभे राहिलेले आम्ही सगळे पाहत होतो. पाऊस, ट्राफिक आणि गाड्यांच्या हॉर्नमुळे प्रवासी अक्षरशः वैतागून गेले होते. 

नवरा दर दहा मिनिटांनी आपण कुठे पोहोचलाय हे पत्नीला विचारत होता. नवऱ्याच्या सततच्या विचारण्याला पत्नी कंटाळून हाताने डोसलू लागली...हे पाहिल्यानंतर उभे असलेले सगळेच हसू लागले. आम्हाला बघून पत्नी शेवटी म्हणाली "काय बाबानू सांगू तुम्हाला माझ्या पदरात पडलंय खूळ" यावर पुन्हा हसा पिकला...तो शेवटपर्यंत...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News