पत्नी माहेरी गेली अन `पब्जी`च्या नादात पतीने आत्महत्या केली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019

नगर: सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेली पत्नी आखाडनिमित्त (आषाढ महिना) माहेरी गेली. आणि पतीने पब्जी गेमच्या आहारी जाऊन डोक्यात डोळी घालून आत्महत्या केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे घडली. राहुल पवार (वय २८, रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

याबाबत श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यात आत्महत्येचे कारण विषद केले नसले, तरी त्याला पब्जी गेम खेळण्याचा छंद होता, असे सांगितले जाते. श्रीरामपूर पंचायत समिती व बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार यांचा तो मुलगा आहे.

राहुल पवार अभियंता (संगणक) होता. सहा महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. पत्नी आखड मासानिमित्त माहेरी गेली होती. आज पहाटे त्याने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. नानासाहेब पवार यांच्याकडे बंदुकीचा परवाना आहे. मात्र त्याने बंदुकीतून गोळी झाडली, की रिव्हॉल्व्हरने हे मात्र समजू शकले नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News