पत्नीने दारू आणायला उशीर केला, पतिने जीव घेतला                    

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019
  • रागाच्या भरात घराच्या बाहेरच तिला मारायला सुरवात केली

ठाणे : दारू आणायला गेलेल्या पत्नीला घरी यायला उशीर का झाला अशी  विचारण तिच्या पतीने तिला बेदम मारहाण केली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला . या प्रकरणी तिचा पती  प्रवीण पूर्विया वय  ३० याला अटक करण्यात आली आहे.  

तो दारू पीत आपल्या घराच्या व्हरांड्यात बसला होता, त्यानंतर त्याची दारू संपली आणि त्याने आपल्या पत्नीला  दारू आणायला पाठवले. परंतू दारू आणायला गेलेल्या पत्नीला यायला थोडा उशीर झाला आणि रागाच्या भरात घराच्या बाहेरच तिला मारायला सुरवात केली. 

या घटनेबाबत पोलिसांनी सांगीतले की अमृतनगरमध्ये राहणारा प्रवीण आपली पत्नी संतोषीला वय २५ दारू आणायला पाठवले होते . तिला घरी परतायला उशीर झाल्यामुळे त्याचा राग अनावर झाला . एवढा उशीर का केला असे म्हणत त्याने तिला दंडुक्याने आणि लाथा बुक्क्याने एवढे मारले कि तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर प्रवीण फरार झाला, मात्र पोलिसांनी त्याला अटक करून कलम ३०२ अंतर्गत त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला . 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News