फोनवर इंटरव्ह्यू देतायं? या गोष्टी ठेवा लक्षात..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • आजकालच्या टिलिफोनिक इंटरव्ह्यूमध्ये उमेदवाराला कंपनीच्या माणसासमोर फेस टू फेस सामोरे जावे लागत नाही.
  • त्यामुळे उमेदवार व्यवस्थित   विचारलेल्या प्रश्नांची उत्तर न घाबरता देऊ शकतो. 

आताची जीवनशैली खूप धावपळीची आहे. आजच्या या धावपळीत खूप मोठया प्रमाणात स्पर्धा सुरु झाली आहे .प्रत्येकाला एक एक क्षण महत्वाचा असतो. आजकाळ बरेचसे ऑफिसर कर्मचाऱ्यांना घेण्याआधी त्यांना  व्यवस्थित पडताळून घेतात. त्याची मुलाखत घेतली जाते. पण आता या दगदगीच्या धावपळीत भेटून मुलखात घेणं जमत नाही. आजची तरुणाई दिवसेंदिवस बदलत चालली आहे, आजच युग डिजिटल होत आहे. त्यामुळे फोनमधून  इंटरव्ह्यू घेणं खूप सोईस्कर झाल आहे. 

आजकालच्या टिलिफोनिक इंटरव्ह्यूमध्ये उमेदवाराला कंपनीच्या माणसासमोर फेस टू फेस सामोरे जावे लागत नाही. त्यामुळे उमेदवार व्यवस्थित   विचारलेल्या प्रश्नांची उत्तर न घाबरता देऊ शकतो. 

फोनवर उमेदवाराने स्वत:चे तंत्र, शिक्षण आणि अनुभव स्पष्टपणे सांगावे. फोन येणार हे माहीत असल्यास फोन येण्यापूर्वी घरात शांत वातावरण ठेवावे. कंपनीचा फोन येण्यापूर्वी तुमचा रेज्युमे, नोटपॅड व पेन घरात तुम्हाला पटकन मिळेल अशा जागी ठेवावा. म्हणजे फोन आला की समोर धरता येईल. तुमच्या क्षेत्रातील बेसिक प्रश्नावली तुमच्यासमोर असू द्या. पाण्याचा ग्लास व रुमाल बाजूला असू द्या. टेलिफोन इंटरव्ह्यूची पूर्वतयारी तुम्ही तुमच्या मित्राबरोबर करून घ्यावी, जेणेकरून स्वत:च्या आवाजाची पडताळणी नीट होईल. काही वेळा कंपनीकडून टेलिफोनवर सॉफ्ट लाफ (हसणे) हा प्रकार लक्षपूर्वक बघितला जातो. त्यामुळे त्याचाही सराव करावा. स्वत:चे नाव स्पष्ट सांगा आणि समोरच्या पलीकडच्या अपरिचित असेल तर स्पेलिंगही सांगा.

विचारलेले सॉफ्टवेअर किंवा कामाचा प्रकार तुम्ही कधी हाताळलेला नसेल तर तसे स्पष्ट सांगा आणि संधी मिळाल्यास शिकण्याची तयारी दाखवा. इंटरव्हूचा शेवट व्यवस्थितपणे करावा. तुम्ही अर्ज केलेल्या पदासाठी संधी मिळाल्यास चांगला परफॉर्मन्स देऊ असा विश्वास द्यावा. शेवटी उमेदवाराने काम करण्याची इच्छा प्रकट करणे व प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा प्रकट करणे व त्यावेळी मनमोकळेपणाने सांगेन अशी शाश्वती देणे आवश्यक असतं. टेलिफोनिक इंटरव्हू कॉन्फरन्स कॉलवर चालतात. पलीकडे एकापेक्षा अधिक लोक स्वत:ची ओळख करून देतील तेव्हा त्यांच्या देशात दिवसाची किंवा रात्रीची वेळ काय आहे हे पडताळून त्यावर योग्य प्रतिक्रिया द्यावी. इंटरव्हू घेणारी व्यक्ती तुमचे बोलणे ऐकून घेण्यासाठी तुम्हाला सलग बोलायला देते. पलीकडून काही प्रतिक्रिया मिळत नाही हे बघून विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी उलट प्रश्न विचारावा.

फोन घेताना आजूबाजूला कुणालाही उभे करू नये, नाहीतर कोणीतरी तुम्हाला मदत करत आहे, अशी प्रतिक्रिया समोरच्याच मनात येईल. पलीकडच्या माणसांचा अ‍ॅक्सेंट समजत नसेल तर गोंधळू नका. परत प्रश्न विचारा आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. वेगाने बोलू नका. ठरावीक वेगाने पण स्पष्ट आणि स्वच्छ बोलाल तर पलीकडच्या माणसाला तुमची गुणवत्ता जोखायला पुरेसा वेळ मिळेल. वाक्यांचे शेवटचे शब्द घाई-गडबडीत गुंडाळू नका. वाक्ये अर्धवट सोडणे, मधेच तोडणे हे उचित वर्तन नाही. टेलिफोनचा माऊथपीस फार जवळ धरू नका. नीट ऐकू येत नसेल तर आपला आवाज नकळत चढतो. मात्र इंटरव्हू देताना तसे करू नका. त्याउलट तुमचे बोलणे नीट ऐकू जात आहे का याची चौकशी करावी. त्याच वेळी लाइन क्लीअर नसल्याचेही नम्रपणाने सांगा.  प्रश्न पूर्ण विचारून संपण्याआधीच उत्तर देण्याची घाई करू नका. पूर्ण बोलणं ऐकून घ्या. मगच बोलायला सुरुवात करा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News