म्हणूनच पुरुष स्त्रियांच्या गाडीवर मागे बसत नाहीत(?)

अक्षय सुनीता मोहन
Wednesday, 30 January 2019

ती गाडी चालवत असल्यामुळे मी मागे बसलो. रस्त्याने चालतांना मी रस्त्यावरील सर्व गाड्या बघत चाललो.कोणताच पुरुष एका मुलीच्या/स्त्रीच्या मागे बसून गाडीवर जातोय हे मला चित्र कुठेच दिसत नव्हतं. मात्र लोकांना न्याहाळताना लोक सिग्नलला वगैरे थांबले की मलाच वेगवेगळ्या नजरेने बघतायत हे माझ्या लक्षात यायला लागलं.

दिवस कालचा, वेळ दिवसभर, ठिकाण पुण्याच्या सगळ्या पेठा! दुपारी मी आणि माझी मैत्रीण दिवसभर काय करायचे म्हणून तिच्या गाडीवर बाहेर पडलो. मग संग्रहालय वगैरे, बाजारपेठ अश्या ठिकाणी फिरायला लागलो. गाडी तिचीच होती, तिनेच चालवत आणली होती. त्यामुळे आम्ही निघालो तेव्हा तीच गाडी चालवत होती.

ती गाडी चालवत असल्यामुळे मी मागे बसलो. रस्त्याने चालतांना मी रस्त्यावरील सर्व गाड्या बघत चाललो.कोणताच पुरुष एका मुलीच्या/स्त्रीच्या मागे बसून गाडीवर जातोय हे मला चित्र कुठेच दिसत नव्हतं. मात्र लोकांना न्याहाळताना लोक सिग्नलला वगैरे थांबले की मलाच वेगवेगळ्या नजरेने बघतायत हे माझ्या लक्षात यायला लागलं. लोकांचे चेहरे बघून मनात काय चाललंय याचा अंदाज मला घेता येत असल्यामुळे!!लोकांच्या डोक्यातील प्रश्नांचा मी तर्क लावत होतो.

हा मुलीच्या मागे बसून चाललाय?

- गाडी चालवता येत नसेल याला.

- रस्ते माहिती नसणार

- मुलगा असून मागे बसतो! शंकास्पद असेल हा...

असे अनेक प्रश्न त्यांना पडले असतील असा माझा अंदाज होता.मात्र एकही व्यक्तीच्या नजरेत मला याहून वेगळे भाव दिसत नव्हते. चित्रपटात बाईकचा सिन दाखविताना हिरोईन गाडी चालवत असतांना हिरोला हायलाईट केलं जातं. बहुतांश चित्रपट हे प्रवाहाच्या विरुद्ध असतात. त्यात असे सिन असले की प्रेक्षकांना आणखी जास्त क्लिक होतं.

पण, मुलीच्या मागे बसून शहरातून फिरतोय असे बघून लोक इतके गंभीरपणे बघतात की मागे तो पुण्यात आलेला एलियन मीच होतो!!! अशी भावना माझी निर्माण झाली. माझ्या दिवसभराच्या फिरण्यात मुलीच्या मागे बसलेला मुलगा नजरेत आला नाही. मात्र माझ्यावर प्रश्नार्थक नजरा टाकणारे असंख्य चेहरे नजरेस आलेत.मुलीच्या मागे बसून शहरात फिरून एक प्रयोग करून बघा. तुम्ही नंतर कधीच मुलीच्या मागे बसून फिरणार नाही.स्वतः गाडी चालवाल.

दुसरे एक मुलींसाठी :

स्त्री-पुरुष समानता वगैरे गप्पा करणारा एखादा फेमिनिस्ट पुरुष जर तुम्हाला भेटला तर त्याला सहज गाडीवर मागे बसवून शहरात फिरवून आना...त्याने जर मागे बसायला नकार दिला तर त्याचा फेमिनिजम कळून येईल.

बाकी सिग्नलवर वेगवेगळ्या नजरा टाकणाऱ्या लोकांना दुर्लक्षित जो करू शकतो!! तोच आयुष्यात ग्रीन सिग्नल मिळवतो..असो...या सिग्नलवर मिळणाऱ्या वेगवगेळ्या नजरेमुळेच पुरुष स्त्रियांच्या मागे बसून फिरत नाही.

विश्वास नसेल तर गुगलवर girl boy with scooter अशी इमेज सर्च करून बघा.तुम्हाला सर्व बॉय गाडी चालवताना व girl मागे बसलेल्या इमेज दिसतील. मुलगा मागे बसलेला फोटो असेल तर त्यात तो असा घाबरत बसलेला दिसेल.

हा स्त्रियांना कमी लेखण्याच्या गोष्टीतून आलेला कॉम्प्लेक्स असतो. जरी त्या दुचाकी पासून विमानापर्यंत सर्वच चालवत असल्या तरी विचार/नजर बदलणे खूप अवघड!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News