मुली आकर्षक का दिसतात?नक्की वाचाच

किरण दानवले
Monday, 1 April 2019

हा प्रश्न जगातल्या सर्व तरुणांना पडत असतो, त्याचे उत्तर देण्याचा एका तरुणीनेच पुढाकार घेऊन प्रयत्न केला आहे. नक्की वाचा, काय आहे; मुली आकर्षक दिसण्याचं कारण?

खूप दिवसांनी काल आमच्यात बोलणं झालं. छान गप्पा-गोष्टी झाल्या. तसे आम्ही फोनवरच बोलत होतो; पण आमच्या गप्पा छान रंगल्या होत्या. बोलता बोलता असाच विषय निघाला, त्याने मला एक प्रश्न विचारला, 'मुली आकर्षक का दिसतात?' मी एका क्षणासाठी गप्प झाले आणि अलगद माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मनात विचार आला कि, हा कसला प्रश्न आहे? ह्याचं मी काय उत्तर देणार? 

मग त्याने पुन्हा मला विचारलं "बोलना गं, मुली आकर्षक का दिसतात?" त्याच्या या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं, हे मला काही सूचतचं नव्हतं. मी अजूनही गप्पच होते. थोडा विचार केला आणि शेवटी मी बोलले; मुलीं;च्या विषयी काय बोलणार? 

म्हंटल तर मुलींच्या विषयी बोलायला खूप काही आहे आणि म्हंटल तर काहीच नाही. आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे. मुली या सहसा प्रेमळ, मन मिळावू स्वभावाच्या असतात. समजूतदारपणा हा एक विशिष्ट गुण मुलींमध्ये असतो; हो पण याला नक्कीच काही अपवाद आहेत. आई-वडिलांचे संस्कार, त्यांची शिकवण तसेच काहीवेळेला परिस्थितीमुळे हा समजूतदारपणा मुलींमध्ये येतो. इतरांना मदत करणे, त्यांच्याशी आपुलकिने बोलणे, घरातल्यांची काळजी घेणे व इतर अशा अनेक गोष्टी मुली आपल्या रोजच्या जीवनात सहज करत असतात. 

त्यांचा कंटाळा किंवा थकवा हा कधीच त्यांना जाणवत नाही. एकप्रकारे हे सगळे गुण एका मुलीमध्ये असतात ते तिच्या आई-वडिलांची पुण्याई आणि देवाची देणगी असं म्हणायला काहीच हरकत नाही, असं मला वाटतं. लांब केस, गोरा रंग, सुंदर चेहरा, छान कपडे ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा मुलीचा स्वभाव, तिचं राहणीमान, तिची वागणूक, ती निभावत असलेले तिच्या आयुष्यातील वेगवेगळे रोल या सगळ्यांमुळे खरं तर, मुली आकर्षक असतात आणि दिसतातही... 

जबाबदारी सकट घेते भरारी,
तक्रार नाही की थकवा नाही!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News