'दंगल गर्ल' बबिताने का केली भाजपाची निवड? 'हे' सांगितलं कारण...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019

भाजपात सेलिब्रेटींची इनकमिंग मोठ्याप्रमाणात सुरू आहे, त्यात काही क्रिडा क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तींनीदेखील हजेरी लावली आहे, त्यातच भर म्हणजे बबिता फोगाट.

देशात दगंल गर्ल म्हणून परिचयास आलेल्या बबिता भोगाटने राजकिय आखाड्यात एंट्री केली आहे. तिने सोमवारीच भाजपा पक्षात प्रवेश केला आहे. बबितासह तिचे वडील महावीर फोगाट यांनीदेखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

भाजपात सेलिब्रेटींची इनकमिंग मोठ्याप्रमाणात सुरू आहे, त्यात काही क्रिडा क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तींनीदेखील हजेरी लावली आहे, त्यातच भर म्हणजे बबिता फोगाट.

काही दिवसांपूर्वी भाजपा सरकारने काश्मिरमधील कलम 370 हटवल्याने देशात काही प्रमाणात आनंदाचे वातावरण पसरले होते, बबिताने देखील ट्वीटकरून भाजपाचे कौतूक केले होते, तसेच तिने एक ट्वीटदेखील केले होते, ज्यात असे म्हटले होते, की 'पंक्चरवाल्याने MRF सोबत व्यापारी संबंध तोडले' हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले होते. एकंदरित भाजपने घेतलेल्या काही ऐतिहासीक निर्णयामुळे बबिताने भाजपाला पसंती दर्शवली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News