मुलीच का होतात नेहमी अत्याचाराचा बळी?

सायली कदम
Thursday, 8 August 2019
  • नेहमी सारखी मी दुपारी कलासवरून आली, माझ्या शेजारच्या घरात आई आणि मुलीची कडाडून भांडण चालू होती, मुलगी रागारागाने आईला बोलत होती; "मला खूप बंधन लादता तुम्ही, घर कमी जेल वाटतंय इथे, असे जेलर आई-बाप  असण्यापेक्षा नसलेले बरे, साधा मला स्वतंत्र आयुष्य जगूही देत नाहीत.

नेहमी सारखी मी दुपारी क्लासवरून आली, माझ्या शेजारच्या घरात आई आणि मुलीची कडाडून भांडण चालू होती, मुलगी रागारागाने आईला बोलत होती "मला खूप बंधन लादता तुम्ही, घर कमी जेल वाटतंय इथे, असे जेलर आई- बाप असण्यापेक्षा नसलेले बरे, साधा मला स्वतंत्र आयुष्य जगूही देत नाहीत.

तिच्या घरातली ती पहिली आणि खुप वर्षांनी नवस, उपास-तापास करून झालेली एकुलती एक मुलगी. पण खरंच तिचे आई- वडील इतके वाईट असतील. खरचं एक आई इतकी क्रूर असेल जी स्वतःच्या मुलीला नकोशी झाली आहे. नऊ महिने पोटात वाढवून कळा सोसून, जग बघण्यासाठी जन्म देते आणि जेव्हा तिची जग बघायची वेळ तेव्हा पिंजऱ्यात अडकवते. जो बाप प्रत्येक मुलींसाठी परिकथेतील हिरो असतो तोच कळत्या वयात तिच्यासाठी व्हिलन का बर बनतो?

मला शाळेत असताना हिंदी मध्ये एक कविता होती';
     "मछ्ली जल की रानी है
      जीवन उसका पानी है
    हाथ लगाओ तो डर जाएगी
   बाहर निकालो तो मर जाएगी
  पानी मे डालो तो तैर जाएगी"

पण कोणाला माहीत होतं ही कविता मुलींसाठी असेल, जेव्हा आई- वडिलांना ह्या कवितेचा अर्थ प्रत्यक्षात आपल्या मुलींसाठी आहे हे समजलं त्यांनी आपल्या मुलीला बाहेर काढनचं बंद केलं.

असं म्हणतात, समाज आहे म्हणून आपण आहोत, पण ह्याच समाजात काही बुरसटलेल्या विचारांचे लोक आहेत. जे एखाद्याची मुलगी हसून कोणाशी बोली तर तिच्या आई-वडिलांनी तिला घाणेरडे संस्कार दिलेत असं म्हणून चारचौघात त्यांच्या संस्काराचे वाभाडे काढतात. एखादी मुलगी कोणत्या मुलाशी बोली, की रस्त्यात कुठेतरी तिच्या आई- वडिलांना थांबवून तुझी मुलगी बघ समाजाच नाव खराब करते किंवा मग चारचौघात बोलणारच. अरे त्या अमक्याची मुलगी अशी कपडे घालते, अरे तमक्याची त्यादिवशी एका मुलाशी बोलत होती. नक्कीच तीचा बॉयफ्रेंड असावा तो, त्यांच लफडं असावं. ह्या बुरसटलेल्या लोकांचे घाणेरडे लेबल आपल्या म्हणून नेहमी भीत असतात.

चला, मानलं! ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सोडून आई- वडिलांनी मुलीला बाहेर सोडलं. पण ह्या डिजिटल युगात मुली किती सेफ आहेत. या ओसंडून वाहणाऱ्या गर्दीत, या मायनगरीत रोज कुठेतरी छेडछाड, कुठेतरी बलात्कार आणि जेवघेणे हल्ले. संत महाराज सांगून गेलेत परस्त्री माते समान, इथे स्त्री सोडाच ३-४ महिन्याच्या जन्माला आलेल्या त्या अबोल बाहुलीला हे घाणेरद्या विचारांचे लोक सोडत नाहीत. 

हे अत्याचार कमी व्हाव्हेत यासाठी सरकारकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. पण समाजातील काही अपप्रवृत्तीमुळे त्या महिला, मुली अत्याचाराच्या शिकार होतातच.आणि सगळ्या गोष्टीं पासून आपल्या मुलीला सुपरहिरो बनून वाचवण्याचा प्रयन्त करणारा तो बाप मात्र मुलीच्या नजरेत व्हिलन बनतो. एक आई जी तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलीला जपते ती जेलर बनते.खरंच! त्या आई- वडिलांची मुलींसाठी असलेली काळजी,भीती चुकीची आहे का? खरंच ते चुकतं आहेत का? याचा विचार नक्की करावा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News