नगरचे प्रश्न सोडवणार तरी कोण ?

जयेश सावंत (यिनबझ)
Saturday, 14 September 2019

अहमदनगर : अहमदनगरचा राजकीय इतिहास पाहता, इथल्या मातीने मागील अनेक दशकांत अनेक राजकीय सत्तांचा उगम आणि ह्रास पहिला आहे. परंतु, आता महाराष्ट्राच्या आधुनिक राजकारणामध्ये विचारसरणीपेक्षा चेहऱ्यांना महत्त्व आले असून, साम, दाम, दंड, भेद अश्याप्रकारे सत्ता हस्तांतरीत करणे, हे अनेकांचे ध्येय झाले आहे. सत्ता आणि त्यातून मिळणारी संपत्ती आणि त्यातून पुन्हा सत्ता, हेच चित्र सध्याच्या राजकारणात चालू आहे.
 

अहमदनगर : अहमदनगरचा राजकीय इतिहास पाहता, इथल्या मातीने मागील अनेक दशकांत अनेक राजकीय सत्तांचा उगम आणि ह्रास पहिला आहे. परंतु, आता महाराष्ट्राच्या आधुनिक राजकारणामध्ये विचारसरणीपेक्षा चेहऱ्यांना महत्त्व आले असून, साम, दाम, दंड, भेद अश्याप्रकारे सत्ता हस्तांतरीत करणे, हे अनेकांचे ध्येय झाले आहे. सत्ता आणि त्यातून मिळणारी संपत्ती आणि त्यातून पुन्हा सत्ता, हेच चित्र सध्याच्या राजकारणात चालू आहे.
 
अहमदनगर जिल्हा एकेकाळी कम्युनिष्टांचा गड मानला जायचा पण आता हा जिल्हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्याने महाराष्ट्राला सहकार दिला आणि याच सहकाराला जोडून आलेले राजकारण देखील. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे आणि थोरात घराण्याचं नाव मोठं आहे.

या दोन्ही घराण्याबरोबरच काळे, कोल्हे, राजळे, गडाख, तनपुरे, घुले, पाचपुते असे साखर सम्राट असलेले राजकारणी आहेत. मात्र या साखर सम्राटातील बहुतेक घराणे विखे आणि थोरात गटांशी विभागले गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण या दोन्ही घराण्यांभोवती फिरत असते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात पक्ष कधीच महत्वाचा नव्हता नात्याचे राजकारण आणि पाडापाडीचे राजकारण हेच या जिल्ह्याचे वैशिष्ट्य ! परंतु या सर्व गोष्टींच्या  राजकरणापलीकडेही एक वेगळं अहमदनगर विविध समस्यांनी ग्रासले आहे हे या राजकारण्यांना कधी कळेल ?   

नगर जिल्यांमधील लोकांचे प्रश्न लोकांच्या व्यथा निवारण्यासाठी नगर जिल्ह्याला आणि नगर जिल्ह्यातील समस्यांना उचलून घेणारा राजकारणी हवा आहे. संपूर्ण महाराष्ट्र जरी पूरग्रस्त दुष्काळ परिस्तिथीने होळपळत असला, तरी नगर जिल्यात पावसाचे प्रमाण अगदी नगण्य आहे. त्यामुळे नगर जिल्याला  सध्या सर्वात मोठा पाणी प्रश्न भेडसावत आहे. कमी पावसामुळे पावसाच्या पाण्याचे नीट नियोजन होत नाही आणि यामुळे गरीब कष्टकरी शेतकरयांना शेतीच्या समस्याही उद्भवू लागल्या आहेत.

जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती आता इतकी भयाण झाली आहे की, शेतीच सोडा, शेतकऱ्यांच्या जनावरांना पिण्यासाठी पाणी भेटत नाही आहे. घरातील पारंपरिक शेती सोडून जर तरुण नोकरीसाठी घराबाहेर पडत असेल तर त्यालाही नगर जिल्ह्यातील अजूनही भेडसावणाऱ्या औद्योगिकीकरणातील समस्यांचा परिणाम बेरोजगारीवर पडत असल्याचे दिसून आले आहे. यासर्वांसोबतच महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आहेच ! मराठ्यांच्या आरक्षणादरम्यान संपूर्ण देशभरात गाजलेले कोपर्डी प्रकरण असो वा भाजप नेते श्रीपाद छिदम यांनी उच्चारलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांविरुद्ध अपशब्द अश्या नानाविध प्रकारांनी नगर जिल्हा आणि त्याचे राजकारण नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे.

आगामी निवडणुकांचा विचार करता, यिनबझच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून आम्ही सामान्य नागरिकांचे हेच प्रश्न उचलण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार आणि त्यांच्या विरोधात कर्जत-जामखेड विभागात उभे असलेले राम शिंदे याच्या पुढ्यातही हे प्रश्न मांडण्यात आले. परंतु, या सर्व गोष्टींचा नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही राजकारणी लक्ष घालत नाहीत असे इथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे. आणि यामुळेच सत्ताधारी राजकारण्यांचे त्यांच्या मतदारसंघातील मतदारांवर लक्ष कमी करू लागलयं की काय ? असा प्रश्न पडतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News