चांगला मित्र कसा ओळखावा?

राजेसाहेब कदम
Thursday, 8 August 2019

क्षणाचाही विलंब न लावता, न लाजता समोरच्याला 'सॉरी'म्हणून मोकळा होतो. महत्वाची गोष्ट ही की मी खोटे बोलून स्वतःचा छळ कधीच करीत नाही.

मी सकाळी सकाळी चेह-यावर हास्य ठेवून जीवनाच्या या स्पर्धेत धावायला सुरवात करतो. आपल्यामुळे कुणाला दुःख होणार नाही ना याचीही मी काळजी घेतो. अडचणीच्या वेळी स्वतःला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतो मी. कधी घसरण्याचा किंवा खाली पडण्याचा प्रसंग आलाच तर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो. मी स्वतःला धीर देत पुन्हा धावत असतो मी जीवनाच्या या जिवघेण्या स्पर्धेत..!

आपल्या हातून काही चांगले घडले असे वाटले तर मीच मला शाब्बासकीही देतो आणि कधी आपल्या हातून काही चुकीचे घडले असे वाटल्यास मी तितक्याच तत्परतेने, क्षणाचाही विलंब न लावता, न लाजता समोरच्याला 'सॉरी'म्हणून मोकळा होतो. महत्वाची गोष्ट ही की मी खोटे बोलून स्वतःचा छळ कधीच करीत नाही.

याचा अर्थ मी परिपूर्ण आहे असा मात्र नाही. माझ्यातही अनेक उणिवा आहेत, त्या दूर करण्याचा मी सदैव प्रयत्न करीत असतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर स्वतःला विद्यार्थी समजायचे, मीही त्यांचे अनुकरण करीत माझ्या कुवतीप्रमाणे स्वतः विद्यार्थी बनून स्वतःतल्या उणिवा दूर करून जे जे नवे आणि चांगले वाटले ते अंगिकारण्याचा प्रयत्न करीत असतो. 

मला एखाद्याचा स्वभाव नाही आवडला तर त्याला काहीतरी अपशब्द बोलून त्याचे व आपले मन कलुषित करण्यापेक्षा 'मौनम् सर्वार्थ साधनम् 'या संस्कृत वचनाप्रमाणे त्याच्यासोबत चक्क अबोला धरतो. 'खोट्याचे आयुष्य छोटे असते' असे म्हणतात.गैरसमजांचेही तसेच असते. 'दुधाचे दुध आणि पाण्याचे पाणी' म्हणतात तसे कालांतराने समज गैरसमज दूर होतातच !गैरसमज दूर झाल्यावर एकमेकांना पुन्हा भेटताना आनंद वाटला पाहिजे,तो वाटण्यासाठी एकमेकांबद्दल अपशब्द बोलायला नको ,आणि त्यासाठी मौनासारखा दुसरा सोप्पा मार्ग नाही.

मी स्वतःच स्वतःचा आरसा आहे. मी स्वतःचा चांगला मित्र बनलो तरच इतरांचाही चांगला मित्र बनू शकेल असे मला वाटते. आपण सा-यांनीच असा प्रयत्न करायला काय हरकत आहे?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News