अणुबाँबच्या संख्येत कोण आहे पुढे? पाकिस्तान की भारत?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019

गेल्या काही दिवसात स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टिट्यूटने आपला अहवाल जाहीर केला. या अहवालात जगभरातल्या किती देशांमध्ये किती अणुबाँब आहेत, याची गणना केली जाते. 

गेल्या काही दिवसात स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टिट्यूटने आपला अहवाल जाहीर केला. या अहवालात जगभरातल्या किती देशांमध्ये किती अणुबाँब आहेत, याची गणना केली जाते. 

गेल्या दहा वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या अणुबाँबच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळते, मात्र भारताच्या तुलनेत पाकिस्तानकडे जास्त अणुबाँब असल्याचेही या संस्थेने घोषित केले आहे.

सध्या कोणाकडे किती अणुबाँब...
भारत               130-140
पाकिस्तान        150-160
रशिया              6500
अमेरिका           6185
फ्रान्स               200
ब्रिटन               200 
चीन                 290 
इस्रायल            80-90
ऊत्तर कोरिया   20-30

या आकडेवारीनुसार सगळ्यात जास्त रशिया आणि अमेरिका या देशांकडे अणुबाँब असल्याचे आपल्याला पाहायला मिळते, तर उत्तर कोरियाकडे सर्वात कमी अणुबाँब असल्याचे पाहायला मिळते.

मोदी सरकारच्या काळामध्ये भारतात संरक्षणावर सर्वात मोठा खर्च केला जातो, सारखीच परिस्थिती पाकिस्तानचीही आपल्याला पाहायला मिळते, मात्र रशिया आणि इतर देशांच्या तुलनेत भारत आणि पाकिस्तानकडे अणुबाँबची संख्या कमी आहे, हे नक्की.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News