जबरदस्ती किस करणाऱ्या तरुणासोबत तिने केले असे काही की..त्याने थेट हॉस्पिटल गाठले  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019

टॅक्सीतून प्रवास करत असताना शेजारी बसलेल्या तरुणाने तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला अश्लील चाळे केले.

जयपूर : महिला आणि तरुणींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच एका घटनेमध्ये तरुणीने युवकाला धडा शिकवला आहे. जयपूर येथे एका ओला टॅक्सीतून प्रवास करत असताना शेजारी बसलेल्या तरुणाने तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीला अश्लील चाळे केले. त्यानंतर नकली पिस्तूल दाखवून किस करण्याचा प्रयत्न केला. संबंधित तरुणीने धाडस दाखवून त्या युवकाची जीभ दाताने तोडली. त्यानंतर आपला बचाव केला. या परिस्थिती जखमी तरुणाने थेट हॉस्पिटल गाठलं. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित युवक हा टॅक्सीचालकाचा मित्र आहे. ही तरुणी २१ वर्षांची असून ती बीबीएची विद्यार्थिनी आहे.  गुरुवारी रात्री ती आश्रम मार्गावरील जी-क्लब येथे एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेली असताना  तेथून घरी परतताना हा प्रकार घडला. त्यावेळी तिने ओला टॅक्सी बूक केली होती. टॅक्सी आली तेव्हा त्यात चालकाशिवाय एक युवकही होता.

तरुणीने विचारणा केल्यानंतर चालकाने तो त्याचा मित्र असल्याचे सांगितले. नंतर त्या मित्राने नकली पिस्तुलचा धाक दाखवत तरुणीशी अश्लील चाळे सुरू केले. एवढ्यावरच न थांबता त्याने नकली पिस्तुलाचा धाक दाखवून तिला किस करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तरुणीने जिभेचा चावा घेत तिथून पळ काढला. संबंधीत तरुणाला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरु आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News