शिक्षकांनां केव्हा मिळेल न्याय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

चुकीचे मॅपिंग झाल्यामुळे जिल्हाभरातील पंचवीस शिक्षक बदली पात्र नसताना बदली पात्र ठरविण्यात आले होते.

औरंगाबाद - चुकीचे मॅपिंग झाल्याने जिल्हाभरातील पंचवीस शिक्षकांना बदलीस पात्र नसतानाही बदलीपात्र ठरविण्यात आले, असा आरोप महाराष्ट्र शिक्षक समिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांना दिलेल्या निवदेनात केला. तसेच या शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले, चुकीचे मॅपिंग झाल्यामुळे जिल्हाभरातील पंचवीस शिक्षक बदली पात्र नसताना बदली पात्र ठरविण्यात आले होते.

याशिवाय मागील वर्षी बदली झालेल्या उर्दू भाषा विषयाच्या जिल्हाभरातील सहा शिक्षकांच्या जागा समानीकरणात टाकण्यात आल्या होत्या; परंतु त्या शिक्षकांना आता फॉर्म भरता येत नाही. कारण जिल्हाभरात उर्दू भाषा शिक्षकाची एकही जागा शिल्लक नाही. त्यामुळे वरील सर्व शिक्षक प्रचंड दहशतीखाली आहेत. त्या शिक्षकांना न्याय मिळावा, अशी मागणी शिक्षक समितीतर्फे करण्यात आली आहे.

निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, रणजित राठोड, नितीन नवले, श्‍यामभाऊ राजपूत, गुलाब चव्हाण, विष्णू भंडारे, शालिकराम खिस्ते, रऊफ पठाण, काकासाहेब जंगले, लक्ष्मीकांत धाडबळे, राजू ठाकूर, राम गायकवाड, के. एल. साळवे, काकासाहेब मगर, अर्जुन पिवळ, एस. एम. चव्हाण, जहांगीर देशमुख, दत्तात्रय खाडे, सतीश कोळी, संतोष जगताप, चंदू लोखंडे, अंकुश वाहूळ, शालिकराम घोरपडे, अंकुश इथ्थर, गणेश सोनवणे, दिलीप धमाले आदींची नावे आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News