...तर भाजपाला पळत्यांच्या मागे लागण्याची गरज काय ? - शिवसेना

सकाळ (यिनबझ)
Friday, 21 June 2019
  • मग भाजपाला पळत्यांच्या मागे लागण्याची गरज काय  ?
  • लोकसभा उपाध्यक्षपदावरुन शिवसेनेचा भाजपला टोमणा
  • लोकसभा उपाध्यपद हा आमचा हक्क ; संजय राऊत 

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्यापाठी शिवसेना खंबीरपणे ऊभी असताना पळत्यांच्या मागे लागण्याची गरज काय ? असा प्रश्न शिवसेनेकडून भाजपाला विचारला गेला आहे. संसदेत बहुमत आहे बहूमत पाठीशी असताना दुस-यांच्या पाठी कशाला फिरत बसायचं असा सवाल देखील सेनेकडून विचारण्यात आला आहे.

शिवसेनेचा भाजपला टोमणा कशासाठी ?

लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने बाजी मारली असली तरी, लोकसभा उपाध्यक्षपद कोणाला मिळणार यावरुन चर्चा रंगत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेस पक्षाला लोकसभा उपाध्यक्षपद देणार अशी चर्चा रंगली असतानाच, शिवसेनेने हा प्रश्न उचलुन धरला आहे. लोकसभा उपाध्यक्षपदाची ‘ऑफर’ रेड्डीला देण्यात आली आहे, शिवसेनेचे 18 खासदार निवडुन आले असूनही त्यांच्या वाट्याला फक्त एकच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. एनडीएमध्ये भाजपानंतर सर्वाधिक खासदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर शिवसेनेनं दावा केला आहे. ती आमची मागणी नाही, तर तो आमचा हक्क आहे. सभेचे उपाध्यक्षपद हे आम्हालाच मिळालं पाहिजे, असंही संजय राऊतांनी सांगितलं होतं.  

 जगन मोहन रेड्डी आपल्याला भाव देत  नाही तर त्यांच्या इतकं मागे लागण्याची गरज आहे का ? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. 17व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून राजस्थानमधील भाजपा खासदार ओम बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदासाठी YSR, शिवसेना की BJD या पक्षांच्या नेत्यांची चर्चा आहे. मात्र, लोकसभेच्या उपाध्यक्षपद शिवसेनेलाच मिळाला पाहिजे असा दावा एनडीएचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं केला आह

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News