“जेव्हा सगळं संपलंय असं वाटायला लागतं, तेव्हा स्वत: शरद पवार समजून मैदानात उतरा.”

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 20 October 2019

“जेव्हा सगळं संपलंय असं वाटायला लागतं, तेव्हा स्वत: शरद पवार समजून मैदानात उतरा.”

जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी त्यांच्या लेखाच्या शेवटी लिहीलेलं वाक्य लीडरशिपच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. पक्षातले जवळचे सहकारी सोडून गेले. वयोमानानुसार शरीर थकलंय. आपल्या राजकीय कारकिर्दीचं जेवढे वय आहे तेवढं वय सुद्धा नसणारे नेते उठून पवारांना अन् पक्षाला राजकारणातून संपवण्याची भाषा करतात. अशी सर्व प्रतिकूल परिस्थिती असताना भर पावसात वयाच्या ऐंशीत असणारे पवार साताऱ्याला सभा घेतात. हे अनुभवणं आपल्या पिढीसाठी अनोखा ठेवा आहे. असो.

लीडरशिप सायन्स विषयाचा विद्यार्थी म्हणून शरद पवारांचे एक लीडर या अनुषंगाने अनेक पैलू जाणवतात. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा शरद पवारांचे काही गुण आत्मसात केले तर नक्कीच एका वेगळ्या उंचीवर असू. लढाऊ बाणा- बाजीप्रभू किंवा शेलारमामा शेवटपर्यंत लढले असं आपण ऐकलंय. हार-जीत हा नंतरचा भाग मात्र शत्रुला जो धडकी भरवतो तो खरा योद्धा. पवार आज त्याच लढाऊ बाण्याने लढताना दिसत आहेत.

दांडगा जनसंपर्क -
वेळेचं नियोजन-
तल्लख स्मरणशक्ती-
शत्रुगोटातली इत्थंभूत माहिती-
शत्रुपक्षाकडून कौतुक-
समोरच्याला मनाचा थांगपत्ता लागू न देणे-
दंतकथा निर्माण होतील एवढं स्वत:चं वलय निर्माण करणं-
बेरजेचे राजकारण करणं-
प्रत्येक क्षेत्राची सखोल माहिती घेणं-
सतत अभ्यासूवृत्ती जागृत ठेवणे-
मदतीस तत्पर राहणं-
आपल्या कार्यकर्त्यांची- सहकाऱ्यांची मुलासारखी काळजी घेणे-
सर्वच क्षेत्रातील दिग्गजांशी मैत्री संबंध प्रस्थापित करणं-

वरील प्रत्येक मुद्द्यावर कितीतरी शब्द लिहीता येईल एवढं पवारांचं कर्तूत्व आहे. एक राजकारणी म्हणून पहाल तर पवारांमध्ये गुण-अवगुण दिसतील.

पण एक लीडर म्हणून पहाल आणि वरचे गुण आत्मसात कराल तर तुमच्या स्वत:च्या क्षेत्रातले शरद पवार व्हाल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News