जेव्हा चंद्रकांत पाटील थेट पत्रकाराला देतात मंत्रिपदाची ऑफर..

सकाळ (यिनबझ)
Saturday, 10 August 2019

पुरग्रस्तांच्या मदतीवरून सरकारवर टीका होत असताना मदतीसंदर्भात एका प्रश्नावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारालाच मंत्रिपदाची ऑफर दिली.

मुंबई : कोल्हापूर आणि सांगलीतील पुरग्रस्तांच्या मदतीवरून सरकारवर टीका होत असताना मदतीसंदर्भात एका प्रश्नावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारालाच मंत्रिपदाची ऑफर दिली.

एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने चंद्रकांत पाटील यांना मदतकार्यावरून प्रश्न विचारला असता त्यांनी थेट सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली. मी आज तुम्हाला महाराष्ट्राचा मंत्री करतो. तुम्ही मंत्रीमंडळात येऊन उद्या किती पाऊस पडू शकतो हे सांगा?, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

सरकार आणि प्रशासनाने हवामान खात्याच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारले असता त्यांनी सारवासारव केल्याचे दिसून आले. नियोजन करण्यात सरकार आणि प्रशासन कमी पडले असे वाटत नाही का?, असा सवाल पत्रकाराने चंद्रकांत पाटलांना केला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News