बस चालवताना वडिलांना मुलगी आयएएस झाल्याचे समजले आणि...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

नवी दिल्ली: यूपीएससी परीक्षेत यशस्वी होणारा प्रत्येक तरुण आपल्या संघर्षाची वेगळीच गोष्ट आपल्याला सांगत असतो. दिल्लीतील अशाच एका तरुण मुलीची कहाणी निश्चितच सगळ्यांना प्रेरणादायी ठरणारी आहे. प्रिती हुड्डा नावाच्या या तरुणीनं आपल्या वडिलांचं स्वप्न साकार केलंय. हरियाणातील बहादूरगडची रहिवासी असलेल्या प्रितीचे वडील दिल्ली नगर परिवहनमध्ये ड्रायव्हरची नोकरी करतात. ते ड्रायव्हिंग करत असतानाचा त्यांना मुलगी आयएएस ऑफिसर झाल्याची गोड बातमी मिळाली होती. वडिलांनी यापूर्वी मला शाबासकी दिली नाही. पण, जेव्हा मी यूपीएससी पास झाल्याचं सांगितलं तेव्हा त्यांनी मला शाबासकी दिली होती.

मुलींची गर्भाशयातच हत्या करणारं राज्य म्हणून ज्या राज्याची ओळख होती. त्याच राज्यातून एक पीएचडीधारक आयएसएस ऑफिसर आज, प्रशासनात कार्यरत आहे. प्रितीने २०१७ मध्ये यूपीएससीची परीक्षा पास केली. त्यात तिचा २८८वा रँक आला होता. 

प्रितीने यूपीएससी परीक्षेत यश मिळवल्यानंतर एक चॅनलला मुलाखत दिली होती. त्यात तिनं आपण एका सामान्य कुटुंबातील असल्याचं सांगितलं होतं. त्याचवेळी वडील दिल्ली परिवहनमध्ये ड्रायव्हर असल्याचंही तिनं सांगितलं होतं. 

प्रितीनं मुलाखतीत सांगितलं की, माझ्यापेक्षा मी आयएएस ऑफिसर होणं हे स्वप्न माझ्या वडिलांनी पहिल्यांदा पाहिलं होतं. जेव्हा माझा रिझल्ट जाहीर झाला तेव्हा मी वडिलांना फोन केला. त्यावेळी वडील बस चालवत होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News