प्रेमात काय महत्वाचे! मी पणा, की तू पणा

अभिनव ब. बसवर
Wednesday, 12 June 2019

भांडणे तेव्हाच होतात जेव्हा टाळी दोन्ही हाताने वाजते. चुका दोन्ही बाजूने असतात. भांडणे तेव्हाच मिटू शकतात जेव्हा दोघेही एक एक पाउल माघार घेतात.

नात्यात नेहमी एका व्यक्तिचं प्रेम हे दुसऱ्यापेक्षा किंचित जास्तच असतं. त्यांची एका बाजूने नातं निभावण्याची, टिकवण्याची धडपड, तगमग चालू असते. काहीही झालं तरी त्यांना ती व्यक्ती गमवायची नसते.  

नातं कोलमडतंय असं जाणवलं की ते अस्वस्थ होतात, भांडतात आणि माफी देखील स्वतःच मागतात. माफी मागतात कारण त्यांना नातं हवं असतं. माफी मागतात कारण त्यांची नात्यात निष्ठा असते. माफी मागतात कारण आजुबाजूला अनेक प्रलोभने असली तरी त्यांना त्यात रस नसतो.

सहसा अशा माणसांच्या नशीबी अगदी उलट स्वभावाची माणसे येतात. जी कधीही सॉरी म्हणत नाहीत. चुका करूनही नजर फिरवतात. हात झटकतात किंवा अगदीच चोराच्या उलट्या बोंबा देखील मारतात. 

भांडणे तेव्हाच होतात जेव्हा टाळी दोन्ही हाताने वाजते. चुका दोन्ही बाजूने असतात. भांडणे तेव्हाच मिटू शकतात जेव्हा दोघेही एक एक पाउल माघार घेतात. पण माघार घेण्यात कोणा एकाचा ईगो आडवा येतो. प्रेमापेक्षा स्वतःचा ईगो सांभाळणं जास्त महत्वाचं वाटू लागतं.

परिणामी ज्याला नातं हवं असतं ते हतबल होतात, रडतात, पूर्णपणे कोसळतात आणि ज्यांना सुटका हवी असते ते कमी काळात मुव्ह ऑन होतात...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News