फेक न्यूजला रोख बसावा म्हणून व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी नवं फीचर सुरु 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 3 August 2019

भारतात मोठ्या प्रमाणात फेक न्यूज व्हायरल केल्या जातात.  व्हॉटसअॅपच्या माध्यमातून तर याचे प्रमाण आणखी वाढले आहे. यावर रोख बसावा म्हणून व्हॉटसअॅपने एक नवं फीचर लाँच केलं आहे. ‘Frequently forwarded’ असं या नव्या फीचरचं नाव आहे.

भारतात मोठ्या प्रमाणात फेक न्यूज व्हायरल केल्या जातात.  व्हॉटसअॅपच्या माध्यमातून तर याचे प्रमाण आणखी वाढले आहे. यावर रोख बसावा म्हणून व्हॉटसअॅपने एक नवं फीचर लाँच केलं आहे. ‘Frequently forwarded’ असं या नव्या फीचरचं नाव आहे. या फीचरच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे की, एक मेसेज कितीवेळा फॉरवर्ड करण्यात आला आहे. अशा मेसेजवर एक डबल अॅरोवाल एक आयकॉन येईल. त्यामुळे आता फक्त एक मेसेज एकावेळी पाच लोकांना सेंड करता येतो.

व्हॉटसअॅपच्या मते एखादा मेसेज किती वेळा फॉरवर्ड करण्यात आला आहे, याची माहिती अँड-टू-अँड एनक्रिप्ट राहील याचा अर्थ ही माहिती इतर कुणी पाहू शकणार नाही. ‘Frequently forwarded’ या फीचरवर गेले काही दिवस व्हॉटसअॅप काम करत होते. जर एखाद्या मेसेजला 5 पेक्षा अधिक वेळा फॉरवर्ड केल्यास त्यावर लेबल दिसेल. 

व्हॉट्सअॅपवर बरेच चैन मेसेज फिरत असतात. त्यावरही आता लवकरच रोख बसू शकतो. व्हॉटसअॅप चैन मेसेजवरही कशा प्रकारे रोख लावता येईल यावर काम करत आहे. व्हॉट्सअॅपच्या या बदलामुळे ग्रुप चाटिंग सोयिसकर होऊ शकते.

गेल्यावर्षी व्हॉटसअॅपने forwarded लेबल लाँच केला होता. हा फीचर जगभरात वापरला जातो. व्हॉटसअॅपवरही फॉरवर्डेड मेसेजच्यावर forwarded असं लिहिलेलं येते. कंपनीच्या या निर्णयांमुळे फेक न्यूजवर बऱ्यापैकी रोख लागलेला दिसत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News