निसर्गाने दिलेला गुण, त्यात त्याची काय चूक? बायल्या म्हटलं म्हणून केली आत्महत्या

तृषा वायकर (यिनबझ टीम)
Wednesday, 10 July 2019

एक अजब असा प्रकार चेन्नईमधून समोर आला आहे. चेन्नईत रहिवासी असलेल्या एका तरुणाने आत्महत्या केली आहे, पण का आत्महत्या केली? याचे उत्तर ऐकाल तर नक्कीच चकित व्हाल. तो तरुण मुलींसारखा वागतो, बोलतो म्हणून त्याला चिडवले जात होते, या चिडवण्याला वैतागून त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

त्याने आत्महत्या करण्यासाठी एक सुसाईड नोट लिहिली होती. त्या नोटमध्ये त्याने असे म्हटले आहे की माझे शरीर पुरुषासारखे आहे; पण मी मुलींसारखा वागतो, मला गे म्हणून चिडवले जाते. यालाच वैतागून मी आत्महत्या करत आहे. मी खूपदा स्वतःवर कंट्रोल केले, पण मला माझ्या मित्र परिवारामध्ये मला बायल्या, हिजडा म्हणून चिडवले जात असे. हे चिडवणे मी सहन करू शकलो नाही, अशा सूसाईड नोटच्या माध्यमातून त्याने जाता जाता आपली खंत व्यक्त केली. पि़डीत तरूण गरीब घरातील आहे. मित्रमैत्रीनींमध्ये आपण वावरत असतो. एकमेकांबरोबर फिरताना मज्जा करताना चिडवाचिडवीही होत असते; पण ती सगळ्यांनाच सहन होतेच, असे नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News