राजकारणात एकाच घरात अनेकांना उमेदवारी देण्याबाबत काय आहे तरूणाईचे मत

महेश घोलप
Monday, 11 March 2019

नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. भारताच्या स्वातंत्र्यापासून भारतभरात लोकशाही नांदत आहे. पण राजकारणात मात्र घराणेशाही नांदत असल्याचे आपण पाहतोय. त्याच अनुशंगाने राजकारणात एकाच घरात अनेकांना उमेदवारी देण्याबाबत तरूणाईची मते आम्ही जाणून घेतली.

भारतात बाहेरून लोकशाही, आतून घराणेशाही होत चालली आहे. लोकशाहीचा देश हा फक्त शाही लोकांचा देश बनत चालला आहे. असं असेलतरी जनताच याला प्रामुख्याने जबाबदार असून नेत्यांनी एका घरात उमेदवारी दिली तरी त्यांना घरी बसवायची ताकत घटनेने लोकांना दिलेली असताना ही लोकं एकाच घरातल्या चार-चार लोकांना वर्षानुवर्षे निवडून देतात. मला वाटतं नेत्यांपेक्षा लोकं जास्त जबाबदार आहेत. काही दिवसांनी लोकांतून नेता व्हायची प्रक्रीया पार कमी होत जाईल.
चांगदेव गीते

लोकशाहीत घराणेशाहीला फार वाव नाही, पण काँग्रेसच्या काही मोजक्या लोकांनी लोकशाहीत घराणेशाही आणली, त्यामुळे लोकशाहीला जे महत्व भेटायला पाहिजे होत ते भेटलं नाही. राजकीय घराण्यांच्या पुढे सामान्य माणूस फार काळ ठिकत नाही. त्यामुळे तो या राजकारणात सहसा पडत नाही आणि लोकांच्या मनात नसता नाही तो उमेदवार सहन करावा लागतो.
प्रदीप बनसोडे, पुणे 

स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रत्येकाला निवडणूक लढण्याची तरतूद करून ठेवली आहे. त्यामुळे प्रत्येकजण उमेदवारीसाठी अर्ज दाखल करू शकतो. मग तो एकाच घरातील असला तरी काही फरक पडतं नाही. 
नितेश कांबळे, विरार

भारत स्वातंत्र्य झाल्यापासून राजकारणात फक्त राजकीय घराणेशाही पहायला मिळते. त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. घटनेत तरतूद करून राजकीय घराणेशाही आता थांबवलं पाहिजे. 
इंद्रजीत ठाकरे, औरंगाबाद 

एकाच घरात अनेकांना उमेदवारी देणे म्हणजे पाकिस्तानला आतंकवाद संपवा हे सांगण्यासारखे आहे. 
सुनिल बागडे, सांगली

एकाच घरात अनेकांना उमेदवारी देणं म्हणजे सामान्य कार्यकर्त्यानी पक्षाच्या पाठीमागे राहून त्यांच्यावर दाखवलेला अविश्वास आहे. सामान्य कार्यकर्ता हाच पक्षाची खरी ताकद असते. एकाच घरात अनेकांना उमेदवारी देऊन पक्ष हा कार्यकर्त्याच फक्त फायदा करून घेतोय हे स्पष्ट दिसून येतं. जर हीच उमेदवारी घराणेशाही न करता सामान्य व्यक्तीला दिली तर त्याचा संदेश सामान्य कार्यकर्त्याना चांगला जाऊ शकतो.
अक्षय खटोकर. कर्जत 

लोकशाही मध्ये जर एकाच घरातील तीन-तीन व््यक्ती उभ्या राहण्यासाठी इच्छूक असतील तर कार्यकत्यानी काय करायचं. 
हनुमंत भिटे, भोर

एकाच वेळेस अनेकांना मते देणे हे माझ्या मते चुकीचे आहे. कारण हयामुळे राज्यशाहीला वाव दिल्या सारखं होईल, समाजातील खरे व्यक्तीमहत्व पुढे येणार नाही. उमेदवार हा जनतेच्या ओळखीचा पाहिजे जेणे करून लोक त्याच्यावर विश्वास करू शकतील. एकाच घरात जर अनेकांना उमेदवारी भेटली तर समाज कधीच एकवटणार नाही,आणि प्रगती तर होणारच नाही?थोड्क्यात  काय तर स्पर्धा होणार नाहीत, आणि स्पर्धा नाही म्हणजे विकास नाही . निवडणुकीसाठी मर्यादित व्यक्तीची निवड केली जाते. म्हणजे मतदार संघनुसार आणि जर एकाच घरात २ उमेदवार असतील तर मग मतदान आणखीन गंभीर होईल. तिकीट मिळण्यास वाद होतील त्यामुळे हे मतदान वेगळ्याच वळणावर जाऊ शकते. 
वैभव कांबळे. सातारा

एकाच घरात अनेकांना उमेदवारी देणं योग्य नाही. कारण अशाने घराणेशाही किंवा आपण इतर लोकांपेक्षा पैशाने बळकट आहोत तसेच इतरांपेक्षा आपल्याला मत जास्त मीळू शकतात. तसेच पैशाने मत विकत घेता येतील असा त्यांचा गैरसमज असतो. म्हणून त्यांना वाटत की आपण जर निवडून येणार आहोत. तर आपल्याच घरात अनेकांना उमेदवारी देणं योग्य आहे.
सुशांत मोरे कर्जत

जो पर्यंत बलाढय व्यक्तीला एक सामान्य माणूस हरवत नाही. तो पर्यंत त्या व्यक्तीला आपल्या कर्तृत्वाची जाणीव होत नाही. ज्या दिवशी जाणीव होईल, तेंव्हा तो आपल्या घरात अनेकांसाठी उमेदवारी मागणार नाही. 
धनश्री पाईकराव कर्जत 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News