शिक्षणव्यवस्थेचा बाजार मांडलाय काय?

सुरज पी. दहागावकर
Thursday, 1 August 2019

ज्या सरकारी शाळेत मागासलेल्या समाजातील पोरांना मोफत शिक्षण मिळत होते. आज त्याच शाळा, कॉलेज बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारी कॉलेजमधील शिकविणारे कित्येक शिक्षक हे कॉलेजमध्ये रेग्युलर क्लास न शिकविता स्वतःचे खाजगी क्लासेस सुरु करुन विद्यार्थ्यांना स्वतःचे क्लासेस जॉईंट करण्यासाठी प्रवृत्त करतात. 

ज्या सरकारी शाळेत मागासलेल्या समाजातील पोरांना मोफत शिक्षण मिळत होते. आज त्याच शाळा, कॉलेज बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारी कॉलेजमधील शिकविणारे कित्येक शिक्षक हे कॉलेजमध्ये रेग्युलर क्लास न शिकविता स्वतःचे खाजगी क्लासेस सुरु करुन विद्यार्थ्यांना स्वतःचे क्लासेस जॉईंट करण्यासाठी प्रवृत्त करतात. 

बिचारे विद्यार्थी तरी काय करतील त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो, क्लासेस जॉईंट केले नाही तर प्रॅक्टिकल मार्क देणार नाही या भीतीने क्लासेस जॉइंट करतात. खाजगी क्लासेसची फीस ही श्रीमंतांच्या पोरांना परवडणारच; पण मागासलेल्या गरीब आणि हुशार पोराचं काय?  मागासलेल्या समाजातील हुशार पोरगं पैसा नाही, म्हणून आता उच्चशिक्षण घ्यायचे नाही का?

मेरिट बचाओ म्हणून बोंबलणाऱ्या प्रत्येकानेच वेळ मिळेल, तर एकदा तुमच्याजवळ असणाऱ्या एका खाजगी क्लासेसमध्ये जाऊन बघा. त्या खाजगी क्लासेसमध्ये तुम्हाला श्रीमंतांचीच पोरं दिसणार, मग आमच्या मागासलेल्या गरीब आणि हुशार पोरांमध्ये धमक नाही का?

धमक आहे साहेब; पण शिक्षणाच्या खाजगीकरणात आमचा समाज फक्त एकाच गोष्टीत मागे पडलाय. तो म्हणजे आर्थिक स्थिती कमकुवत आहे. आर्थिक बाजू कमकुवत आहे म्हणून किती खाजगी क्लासेसच्या संचालकांनी गरीब आणि हुशार पोरांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना देशातल्या उच्च युनिव्हर्सिटीमध्ये पाठविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

गरीब आणि हुशार पोरांमध्ये तुम्हाला त्याची मेहनत दिसत नाही, कारण श्रीमंताकडून येणारा करोडो पैसा तुमच्या डोळ्यासमोर दररोज नंगा डान्स करत असतो आणि तुम्ही त्यांच्याच मुलांना आपल्या क्लासेस मध्ये प्रवेश देणार. क्योंकी "पैसा बोलता है ना साहब.."

माझ्या मते तरी खाजगी क्लासेस सुरु करणे हा असा एकमेव व्यवसाय आहे की ज्यामध्ये एक रुपयांचीही गुंतवणूक न करता करोडो रुपयांचा फायदा होतो. म्हणूनच एकेकाळी जे शिक्षक सरकारी कॉलेजमध्ये शिकविण्याचे काम करीत होते त्यांनी नोकरीला रामराम ठोकून स्वतःचे खाजगी क्लासेस सुरु करून पैशाचा कारखाना टाकला आहे.

हुशार विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे न बघता एक बिजनेस म्हणून खाजगी क्लासेस उघडण्यात येते, पण संचालक साहेब तुमच्या अशा कारस्थानामुळेच आमच्या गरजू आणि हुशार पोरांच्या भविष्याशी छेडछाड होते, मग आमचा पोरगा तुमच्या पैशांच्या धंद्यात टिकणार का? ज्याच्या घरी एक वेळेचे खायचे वांदे आहेत, तो पोरगा कुठून आणणार हो तुमच्या क्लासेससाठी लाखो-करोडो रुपये?

एकीकडे खाजगी क्लासेसवाले विद्यार्थ्यांकडून लाखो-करोडो लुटताना दिसतात आणि दुसरीकडे बिहारमधील "आनंद कुमार" नावाचा शिक्षक समाजातील गरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये शिकवतात आणि नुसतं फ्रीमध्ये शिकवीतच नाही तर त्यांच्या राहण्याचा, खाण्याचा आणि शिक्षणाचा खर्च स्वतः उचलून देशाच्या उच्च युनिव्हर्सिटीमध्ये पाठवितात. 

खाजगी संचालकांनी आनंदकुमार सरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जास्तीत जास्त गरजू आणि हुशार पोरांना फ्रीमध्ये शिक्षण द्यावे. संचालक साहेब फ्रीमध्ये गरजू मुलांना शिकविणे सुरु केले तर तुम्ही काय गरीब होणार नाही आहात.

शेवटी तुम्हाला राग आला तरीही चालेल पण एकच म्हणतो, साहेब तुम्हाला श्रीमंताकडून जो पैसा मिळतो ना; त्यामुळेच तुम्ही माजलेले आहात; पण साहेब एक विनंतीसुद्धा करतो. हा शिक्षणाचा धंदा जरासा बाजूला ठेऊन समाजातील गरीब, होतकरू आणि हुशार पोरांसाठी फ्री शिक्षण कसे देता येईल याचाही विचार करा.

सरकारनेसुद्धा अशा शिक्षणाच्या नावावर चालणाऱ्या काळ्या धंद्यावर बंदी आणून समाजातील तळागाळातील गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी उच्चशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे समाजातला कोणताही विद्यार्थी हा शिक्षण घेण्यापासून वंचित राहणार नाही आणि शिक्षणाच्या प्रवाहात गरीब आणि श्रीमंत असा प्रकार दिसणार नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News