तुम्ही कसले कॉमेंटेटर? तु्म्हाला खेळाडूंचा सन्मान करता येत नाही - जडेजा भडकला

सुरज पाटील
Thursday, 4 July 2019

सध्या वर्ल्ड कपचा खेळ जितक्या प्रमाणात मैदानावर रंगत आहे, त्याचबरोबर तो खेळ मैदानाच्या बाहेरही रंगत आहे. सध्या खेळाडू आणि कॉमेंटेटर यांच्यात खडाजंगी होताना दिसते. या आधी सचिन तेंडूलकर आणि धोनी यांच्यातील कमेंटमुळे क्रिकेट चाहत्यांनी सचिनला ट्रोल केले होते, अता तसाच एक प्रकार रंगताना दिसत आहे.

सध्या वर्ल्ड कपचा खेळ जितक्या प्रमाणात मैदानावर रंगत आहे, त्याचबरोबर तो खेळ मैदानाच्या बाहेरही रंगत आहे. सध्या खेळाडू आणि कॉमेंटेटर यांच्यात खडाजंगी होताना दिसते. या आधी सचिन तेंडूलकर आणि धोनी यांच्यातील कमेंटमुळे क्रिकेट चाहत्यांनी सचिनला ट्रोल केले होते, अता तसाच एक प्रकार रंगताना दिसत आहे.

तुम्ही कसले कॉमेंटेटर? तु्म्हाला खेळाडूंचा सन्मान करता येत नाही - जडेजा भडकला सध्या वर्ल्ड कपचा खेळ जितक्या प्रमाणात मैदानावर रंगत आहे, त्याचबरोबर तो खेळ मैदानाच्या बाहेरही रंगत आहे. सध्या खेळाडू आणि कॉमेंटेटर यांच्यात खडाजंगी होताना दिसते. या आधी सचिन तेंडूलकर आणि धोनी यांच्यातील कमेंटमुळे क्रिकेट चाहत्यांनी सचिनला ट्रोल केले होते, अता तसाच एक प्रकार रंगताना दिसत आहे. माजी खेळाडू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांच्यात अशाच एका कमेंटमुळे ट्वीटरवर वाद होताना दिसत आहे. इंग्लंड विरुध्द भारताचा सामना सुरू असताना काही वेळासाठी भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाला. याच सामन्याचा आधार घेत कॉमेंटेटर मांजरेकर यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, रविंद्र जडेजाला यापूढे होणाऱ्या सामन्यात घ्याव की न घ्याव? यावर उत्तर देताना मांजरेकर यांनी जडेजाला टोला लगावला असल्याचे पाहायला मिळाले. थोडी बॅटींग आणि थोडी बॉलिंग करणाऱ्या (बिट्स अॅंड पीसेस) खेळाडूंचा मी चाहता नाही. सध्याच्या परिस्थिती जडेजाची अशीच भूमिका आहे, त्यामुळे आता स्पेसालिस्ट बॉलर आणि स्पेशालिस्ट बॅट्समनला मी पसंती दर्शवीन आणि संघाला त्याचीच गरज आहे. मांजरेकर यांनी दिलेल्या या उत्तरला प्रतिउत्तर देत एक ट्वीट केलं आहे की, काहीही झालं तरी तुमच्यापेक्षा कितीतरी दुप्पट सामने मी खेळलो आहे आणि अजून खेळेन. सगळ्यात आधी ज्या खेळाडूंची कारकिर्द यशस्वी ठरली आहे, त्यांचा मान करा. दरम्यान जडेजाच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून हे ट्वीट शेइर करण्यात आले आहे. त्यानंतर मात्र 'संजू मंजू' याप्रकारचा हॅशटॅग सोशल मीडियावर शेअर होत आहे.

माजी खेळाडू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांच्यात अशाच एका कमेंटमुळे ट्वीटरवर वाद होताना दिसत आहे. इंग्लंड विरुध्द भारताचा सामना सुरू असताना काही वेळासाठी भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाला.   

याच सामन्याचा आधार घेत कॉमेंटेटर मांजरेकर यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, रविंद्र जडेजाला यापूढे होणाऱ्या सामन्यात घ्याव की न घ्याव? यावर उत्तर देताना मांजरेकर यांनी जडेजाला टोला लगावला असल्याचे पाहायला मिळाले. थोडी बॅटींग आणि थोडी बॉलिंग करणाऱ्या (बिट्स अॅंड पीसेस) खेळाडूंचा मी चाहता नाही. सध्याच्या परिस्थिती जडेजाची अशीच भूमिका आहे, त्यामुळे आता स्पेसालिस्ट बॉलर आणि स्पेशालिस्ट बॅट्समनला मी पसंती दर्शवीन आणि संघाला त्याचीच गरज आहे.

मांजरेकर यांनी दिलेल्या या उत्तरला प्रतिउत्तर देत एक ट्वीट केलं आहे की, काहीही झालं तरी तुमच्यापेक्षा कितीतरी दुप्पट सामने मी खेळलो आहे आणि अजून खेळेन. सगळ्यात आधी ज्या खेळाडूंची कारकिर्द यशस्वी ठरली आहे, त्यांचा मान करा. 

दरम्यान जडेजाच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून हे ट्वीट शेइर करण्यात आले आहे. त्यानंतर मात्र 'संजू मंजू' याप्रकारचा हॅशटॅग सोशल मीडियावर शेअर होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News