जग फोटोग्राफरचं ! दिसणाऱ्या फोटोमागे काय घडतं?

पूजा ढेरिंगे
Tuesday, 29 January 2019

आजचा दिवस हा सगळ्या फोटोग्राफर्सच्या जिव्हाळ्याचा दिवस असतो. जीव असलेल्या कॅमेराबद्दल पार जीव ओवाळावा इतकं प्रेम येतं नि एक फोटोग्राफीचा काळ डोळ्यासमोरून जातो....

आजचा दिवस हा सगळ्या फोटोग्राफर्सच्या जिव्हाळ्याचा दिवस असतो. जीव असलेल्या कॅमेराबद्दल पार जीव ओवाळावा इतकं प्रेम येतं नि एक फोटोग्राफीचा काळ डोळ्यासमोरून जातो....

बदलत्या काळासोबत किती गोष्टी बदलतात. आणि बदल हा या फोटोग्राफीचा सगळ्यात प्रमुख नियमच जणू ! जसं जसं काळ बदलत गेला, तेव्हा तेव्हा हा काळ कैद करून ठेवलाय तो या कॅमेराने. कॅमेराने काळही स्विकारला नि तोच काळ सतत कैद करण्याचं अमीष फोटोग्राफर्सला सूपूर्दही केलंय. फोटोग्राफीने सामान्यातल्या सामान्याला अमीर बनण्याची मुभा दिली. स्वतःच्या निव्वळ वेगळ्या दृष्टीने, दृष्टीकोणाने स्वातंत्र्य दिलं स्वतःच असं वास्तविक आयुष्य कल्पनेत जगण्याचं. एकदा हातात कॅमेरा आला की सुरुवात जरी स्ट्रीट फोटोग्राफी, कॅन्डीड फोटोग्राफी,  पोट्रेचर फोटोग्राफी यांचे अगणित प्रयत्न करून होत असली तरी, त्याचा शेवट कुठे नसतो, हे फोटोग्राफीचं गूढ असतं. माणूस रोज नवीनपणे खुश होऊ शकतो ही ताकद तिच्यात असते.

कालपर्यंत घर कॉलेजचा उंबरठा सोडून, दुसरे कुठलेही स्वप्न न जगणारा हाच फोटोग्राफर आपल्याच विश्वात अमीरांचा बादशाह होऊन स्वप्न बघतो ट्रॅव्हलर बनण्याचं, जगभर फिरून ते जग आपल्या कॅमेराने कैद करून स्वत: जगून लोकांपर्यंत ते सुपूर्द करण्याचं... आणि इथेच त्याच्याही नकळत एका गरिबाचं एक व्यक्तीमत्व नकळत पडद्याआड तयार होत असतं. तो एक फोटोग्राफर म्हणून वृद्धिंगत होत असतोच, पण घडवत असतो स्वतःच एक संवेदनशील मन आणि त्याचबरोबर एक भटका ट्रॅव्हलर, ट्रेकर, आणि एक जगाला जगापर्यंत पोहोचवण्याचा दुवा.

वैयक्तिक पातळीवर, तसं माझ्यासाठी फोटोग्राफी ही डीएसएलआरपासून सुरु झाली नाही. तिची सुरुवात ही टकटक मोबाईलपासून. तसं मनात ठेवलं नि फोटो काढला, अशा अर्थी मी कधी फोटोग्राफीकडे वळलेच नाही. हे तंत्रज्ञान असलं तरी माझ्यासाठी हे जादूचं खेळणं होतं, जे मला आनंदी ठेवत होतं. लहानपणी माझ्यासाठी हे फोटोग्राफीचं जग एका दुरदेशी असलेल्या आणि कधीही आपल्या हाती न लागणारं खेळणं होतं. पण मोठी होत गेले. शिक्षण घेता घेता कॉलेजच्या कॅंपसला कॅमेराचं वरदान मिळालं नि मला ते दिसलं. हातात ते वेव्ह फोनमधून न येणारे, सगळे ब्लर्ड फोटो खचाखच न खचता क्लिक करायला लागले. हळूहळू न दिसणारं स्वप्न माझ्यासमोर येउ लागलं नि नकळत मित्राने उधार म्हणून कॅमेरा माझ्याकडे ठेवायला दिला. त्यातून जन्म झाला एका तोडक्या मोडक्या फोटोग्राफरचा ! आणि वाटायला लागलं 'या क्षणी मी या आयुष्याचे सगळ्यात सुंदर क्षण जगतेय.' जेव्हा मी हातात हा कॅमेरा घ्यायचे. त्यामुळे लिखाणाचं भूत होतंच त्यात कॅमेराने आपलंस केलं नि माझी दृष्टी मोट्ठी होऊ लागली.  हा माझा अनुभव आणि मी घडले, चुकून उधार कॅमेरा हातात आल्यानंतर... 

माझ्यासाठी फोटोग्राफीचा सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे आरशातली फोटोग्राफी...

या प्रकारात ना कुणा फोटोग्राफरची गरज असते. तिथे असतो फक्त तुम्ही आणि कॅमेरा. त्याला हॅण्डल करून त्यातून स्वतःला कसं सुंदर दिसावायचं ही जोखीम भयंकर मोहक असते.  ती कशी त्याची ही उदाहरणं ;

तसं लोक म्हणतात, "एक फोटो हजारो शब्द व्यक्त करतो.", पण एक फोटोग्राफ घ्यायला हजारो क्लिक्स काढून बघावे लागतात, हे अव्यक्तच राहते. त्यामागे आवड, छंद जरी असला तरीही तिथे शारीरिक कष्ट अव्यक्त असतात. मन सुखी असतं पण शरीराला सूज येउन जाते. पण फिकर त्याची नसते, हजारोतून एक निवडणं ही दुसरी जोखीम असते.

सध्याच्या परिस्थितीला अल्मोस्ट लोकांसाठी फोटोग्राफी हे एक फॅड झालं आहे. हातात कॅमेरा आला कि ऑटोवर कॅमेरा टाकायचा आणि ते क्लिक बटनची जागा शोधायची आणि एकेक फोटो काढत बसायचं. आक्षेप तिथे माझा नाही, पण हे किती दिवस? ऑटोच्या पुढे जाऊन मॅन्युएलवरही प्रयत्न करून केव्हा बघणार? तिथेच खुश राहणारे हे असतात. म्हणजे एखाद्या खेळण्याला मोठ्या आनंदाने विकत घ्यायचं नि त्याला नीट न्यायही द्यायचा नाही? त्याचा लोक करतात तसाच वापर करायचा? नवीन असं काहीच नाही? अशावेळी वाटतं पुढे जावं त्यांनी. त्यात मजा आहे, त्यात नशा आहे. ती समजून घ्यावं त्यांनी. असो! ही ज्याची त्याची आवड... यापुढे जाऊन काही लोक म्हणतात मला यातील तांत्रिक बाबी समजत नाही. चुकत आहेत तुम्ही. फोकस तुमचा चुकतोय. आयएसओ, अपर्चर, शटरस्पीड, या सगळ्या भंपक कल्पना आहे. जोड याची हवीच, पण 'प्रकाश' हा याचा महत्वाचा जोडीदार ठरतो. तो ओळखता यायला हवा आणि तोचतोचपणा फोटोत आणण्यापेक्षा आपल्या दृष्टिकोनाला आव्हान देता यायला हवं, मग 'डीएसएलआर आहे म्हणून फोटो काढतो.' हे टोमणे बंद होतात.

बाय दी वे, 'बीहाईंड दी सिन... ' म्हणजे 'दिसणाऱ्या फोटोच्या मागे काय घडतं? 'हे फोटोग्राफीत सगळ्यात मोठं वरदान किंवा शापही असतो म्हणा... जर फोटोमागे घडतं ते सगळं आपल्याला हवं तसं असेल तर तो फोटो आपल्याला हवा तसा मिळतच नाही. याशिवाय फोटो ज्याचा क्लिक करणार असतो त्यांच्यात आणि फोटोग्राफरमध्ये अंडरस्टॅन्डिंग आणि मॅच्युरपणा नसेल तर सगळा फोटोशूट फ्लॉप जाऊन मग त्या शूटला नीट करावं लागतं फोटोशॉप किंवा स्नॅपसीडसारख्या एडिटिंग ॲप्समध्ये. पण या दोनच गोष्टी नसतात फोटोच्या मागे. तिथे असते धम्माल, फेक कॅन्डीड काढण्याचे भयानक भारी प्रयत्न. त्याचबरोबर माझ्या अनुभवावरुन तरी हे फेक कॅन्डीडच फोटोग्राफरला बेस्ट आणि इतरांहूनही वेगळा फोटो, फ्रेम देतात. त्यामुळे हा बीहाइण्ड दी सिन एक अनोखा आणि प्रत्येक शूटला वेगळा माहोल देणारा भाग असतो.

फोटोग्राफीने जसं फोटोग्राफरला विश्व दिलं तसंच, स्वतःच विश्व दिलं या 'नजरेला.' नजरेलाही एक विश्व असतं, तिलाही आपलं मन कुठल्यातरी माध्यमातून व्यक्त करता येतं. या विश्वात माणसाच्या मनातलं नजर व्यक्त करते आणि त्याच नजरेला व्यक्त व्हायचं असतं तेव्हा हा  कॅमेरा तिचं माध्यम बनतं. या सगळ्या अनुभवांतून एक मोडकीतोडकी फोटोग्राफर झाल्यानंतर एकच घटित कळलं,"निसर्गापेक्षा सुंदर फोटोग्राफर नाही आणि माणसांच्या डोळ्यांपेक्षा सुंदर लेन्स नाही." तरीही स्वतःसाठी करत राहूा या कॅमेराचे लाड आणि बनू होममेड खुशीचा हकदार!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News