मैत्री म्हणजे नक्की काय असतं

आबासाहेब म्हस्के
Tuesday, 13 August 2019

का कुणास ठाऊक त्यांना आपला महत्त्व कमी होईल की काय असंही वाटत असावं बहुदा. काही तर आम्हाला लाईक केलंच, पाहिजे आमचा तो अधिकारच आहे पण आम्ही मात्र कोणालाही लाईक करणार नाही असं तोऱ्यात वागतात. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

मैत्री म्हणजे दोन मनाचं प्रेमाचं आपुलकीच, विश्वासाचं अतूट नातं. भावनांचा ओलावा, तो जिव्हाळा निःस्वार्थ, सात्विक प्रेमाची अनुभूती म्हणजे मैत्री. मैत्रीत जात धर्म, वंश, प्रदेश, वर्ण, स्त्रीपुरुष असं काहीही बंधन आड येत नाही. दोन निकोप मनाच्या विचाराची देवाणघेवाण असते. मैत्री म्हणजे अहंकारास कात्री, दुःखरूपी पावसापासूनची काळजी घेणारी संरक्षक छत्री. एकमेकांना सावरणारी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, विश्वासाची जणू चतुसूत्रीच. परस्परांचे मन एकमेकात एवढे गुंतलेले असते की ते जवळ असो नसो ओढ ही कायमची असते.

आई वडीलानंतर सर्वात जवळचं आणि जिवाभावाचं नातं कुठलं असेल तर ते मैत्रीचं. गरीब - श्रीमंत कुणीही असो त्याला मित्र हे असतातच. सुख दुःखात सोबत करणारे, चांगलं वाईट समजून सांगणारे मित्र भेटणे तसे दुर्मिळच. पण मनातले सारे काही सांगायचे हक्काचे स्थळ म्हणजे मित्र - मैत्रीण. जगातील एकमेव नातं हे असं असतं की हे जाणून बुजून, समजून उमजून निःस्वार्थीपणे प्रस्थपित होतं, चिरकाल टिकत, वृद्धिंगत होतं. मैत्री हे नातं रक्ताच्या नात्यापलिकडचं असतं. त्याला कसलंही बंधन असू शकत नाही.

मित्र असावा सूर्यासारखा तेजस्वी अढळ सत्याचा मार्ग दाखवणारा. चुकल्यास सावरणारा संकटात खंबीरपणे पाठीमागे उभा राहणारा. मैत्री कुणाशी करावी, कुणाशी करू नये फक्त ओळखता आलं पाहिजे. मैत्रीत परस्परावर अतूट विश्वास, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, सहानुभूतीवर मैत्री तग धरू शकते. हेही तितकंच खरं. हल्ली व्हाट्सअप फेसबुकमुळे मित्र - मैत्रिणी मिळणं सुकर झालं असलं तरी त्यातही बरेचसे धोके निर्माण झाले आहेत हेही नाकारून चालणार नाही. शेवटी काय तर आपण जसे असाल तसे जग आपणास दिसेल. समाज हा आरशासारखा असतो. प्रेम वाटलं प्रेमचं मिळेल. विष पेराल विषच वाट्याला येईल. हे ठरलेलं .

मानवी स्वभावानुसार विविधांगी - विविधढंगी व्यक्तिमत्व आपणास पाहावयास मिळतात . काही लोक चांगलं सकस लिहीतात पण त्यांना नवलेखकांचं वावडं असल्यागत फटकून वागताना दिसतात. का कुणास ठाऊक त्यांना आपला महत्त्व कमी होईल की काय असंही वाटत असावं बहुदा. काही तर आम्हाला लाईक केलंच, पाहिजे आमचा तो अधिकारच आहे पण आम्ही मात्र कोणालाही लाईक करणार नाही असं तोऱ्यात वागतात. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

असो ज्याचे त्याचे संस्कार, विचारधारा, हेवेदावे अन् पूर्वग्रहसुद्धा असू शकतात. चांगलं घ्यावं वाईट ते सोडून द्यावं. मत व्यक्त करण्याची फार मोठी साधनं उपलब्ध झाली असताना आपण ती साधनं विधायक कामासाठी फारसे वापरताना दिसत नाही हे प्रकर्षानं जाणवत आणि त्याचं वाईटही वाटत. काही जण बोटावर मोजण्याइतके लोक त्याचा प्रभावीपणे वापर करताहेत हेही खरं आहे. पण म्हणावं असं विधायक काम होणे अजूनही गरजेचं आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे असो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News