.....आणि काय हवं?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट. हे रिअल लाईफ कपल ‘टाईम प्लीज’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या समोर आलं आणि त्यांची रिअल लाईफ केमिस्ट्री तितकीच हिट ठरली.

आता प्रिया-उमेश पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत. चित्रपट, मालिकांमध्ये नव्हे; तर एका वेबसीरिजसाठी हे दोघे एकत्र आले आहेत. ‘आणि काय हवं...?’ असे या वेबसीरिजचे नाव आहे.

उमेश-प्रियाने त्यांच्या सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. वरुण नार्वेकर यांनी या वेबसीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. आता या नव्या वेबसीरिजमध्ये प्रिया-उमेशची जोडी काय कमाल करते हे पाहणं रंजक ठरेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News