शिवसेनेच्या वचननाम्यात विद्यार्थी आणि युवकांसाठी काय?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 12 October 2019

विधानसभा निवडणूक 2019 साठी शिवसेना पक्षाचा 'वचननामा' पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (शनिवार, 12 ऑक्टोबर) सकाळी मातोश्री निवासस्थानी प्रसिद्ध केला. या वचनाम्यात मुलींना महाविद्यालयीन विनामूल्य शिक्षण, नागरिकांना एका रुपयात औषधोपचार आणि 10 रुपयांत सकस जेवणाची थाळी तर शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 10 हजार रुपये देण्याचं वचन शिवसेनेनं दिलं आहे. 

शिवसेनेच्या 16 पानी वचननाम्याला हीच ती वेळ असं नाव देण्यात आलेलं आहे. यामध्ये शेतकरी, महिला आणि तरूणांना प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवलं आहे. विविध योजनांच्या माध्यमांतून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

वचननाम्यात विद्यार्थी आणि युवकांसाठी काय?

15 लाख पदवीधर युवकांना युवा सरकार फेलोमार्फत शिष्यवृत्ती
तालुकास्तरावर ओपन जिम
35 वर्षांखालील युवांना स्वयंरोजकार उद्योगासाठी एमआयडीसीमध्ये तसंच घरासाठी सिडको आणि म्हाडामध्ये आरक्षण
विद्यार्थी एक्सप्रेस नावाच्या 2 हजार 500 विशेष बस
आर्थिक दुर्बल घटक व शेतमजूरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदर कर्ज
विद्यार्थिनींना मोफत स्वयंसंरक्षणाचे शिक्षण
माध्यान्ह भोजन योजनेत उत्तम अंमलबजावणी
प्रत्येक विद्यार्थ्यांची मानसिक व शारिरीक तपासणी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News