प्रेमात काय काय करावं लागतं ?; सारखं पिल्लू पिल्लू करावं लागत राव! (ब्लॉग)

अभिनव ब. बसवर
Thursday, 13 June 2019

हल्ली एक दोन महिने दुरावा आला तरी नाती फिस्कटतात. लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशीप म्हटलं की आम्हा तरुणांच्या पोटात गोळा येतो. व्हाट्सएप वर सकाळी साधा 'लव्ह यू' मेसेज नाही आला तर दिवसभर अबोला धरणारे देखील आहेत.

हल्ली एक दोन महिने दुरावा आला तरी नाती फिस्कटतात. लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशीप म्हटलं की आम्हा तरुणांच्या पोटात गोळा येतो. व्हाट्सएप वर सकाळी साधा 'लव्ह यू' मेसेज नाही आला तर दिवसभर अबोला धरणारे देखील आहेत.

जरा कुठे सर्दी झाली तरी पिलु पिलु करावं लागतं नाहीतर पिलु रुसुन बसू शकतं. सतत आनंदी राहण्यासाठी बाहेर फिरणं,खाणं, मूव्ही आणि एखाद्या निर्जन स्थळी गुलुगुलु गप्पा तर हव्यातच. मधून अधुन सरप्राइज् गिफ्ट्स दिले की स्वारी खुश.

सतत भेट ही व्हायलाच ह्वी नाहीतर जोडीदाराचा आपल्यातील इंटरेस्ट कधी संपेल सांगता येत नाही. खोटं बोलणं, लपवाछपवी.जोड़ीदाराव्यतिरिक्त एखाद्या दुसरयाच व्यक्तिशी मनातील भावना शेअर करणं. हळू हळू दोन व्यक्तिंमध्ये गुंतत जाणं आणि कोणा एकाच्या भावनेचा कडेलोट करुन टाकणं. सोकोल्ड भाषेत ब्रेकअप.

नातं टिकण्यासाठी काय करायचं ? दीड दोन वर्षे एकमेकांची भेट नाही. संपर्क साधण्याचं कोणतं साधन नाही. खाजगी संवाद तर सोडाच. घरात दुडूदुडू खेळणाऱ्या तान्ह्या बाळाला पाहिलं नाही.काळजी,लाड,कोडकौतुक करावं असल्या अपेक्षा नाहीत. आपल्याच लोकांकडून गलिच्छ आरोप,मानहानी आणि सततचा जीवनाशी संघर्ष.

एवढी संकटं असूनही प्रेम टिकून राहतं. एकमेकांवर प्रचंड विश्वास. यासमोर आपल्या आयुष्यातील संकटे म्हणजे फुटकळ गोष्टी. नातं टिकवायचं असेल तर एकदा शंभू राजे आणि येसूबाई राणीसाहेब यांचे स्मरण करावे. तुमची वाट तुम्हाला सापडून जाईन...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News