खैरे, अडसूळ, गितेंचा पराभव ईव्हीएममुळेच ? राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Saturday, 10 August 2019

ईव्हीएम सेटिंगद्वारेच भाजपने शिवसेनेच्या वरिष्ठ चार नेत्यांचा पराभव केला.

मुंबई - ईव्हीएमच्या सेटिंगमुळेच चंद्रकांत खैरे, अडसूळ, गिते आणि आढळराव पाटील यांचा पराभव झाल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी सांगितले. श्रीरामाचा वारसा सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने ईव्हीएम रद्द कराव्यात आणि मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्यावात, असे जाहीर आवाहनही ठाकरे यांनी केले. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

म्हणून केला खासदारांचा पराभव केला 

ईव्हीएम सेटिंगद्वारेच भाजपने शिवसेनेच्या वरिष्ठ चार नेत्यांचा पराभव केला. चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, शिवाजी आढळराव पाटील, अनंत गिते या चार जणांना मंत्रिपदे देता येऊ नयेत म्हणून त्यांचा भाजपने पराभव केला. हिंदू - मुस्लिम तणाव तेवत ठेवण्यासाठी इम्तियाज जलील यांना भाजपने ईव्हीएमच्या साहाय्याने निवडून आणल्याचाही आरोप त्यांनी केला. मी भाजपविरोधी बोलतो म्हणून ईडीची चौकशी माझ्यामागे लावली जाणार असल्याच्या बातम्या आल्या. मला ईडीकडून काहीही विचारणा झालेली नाही.

सांगली, कोल्हापूरमधील महापुरामुळे येत्या २१ ऑगस्ट रोजीचे ईव्हीएमविरोधी आंदोलन लांबणीवर टाकण्यात येत आहे. साधारण २८ - २९ ऑगस्टनंतर हे आंदोलन होईल, अशी घोषणा त्यांनी या वेळी केली. हे आंदोलन मनसेचे नाही. सर्व पक्ष, सामाजिक संघटनांचे हे आंदोलन आहे. भाजप व शिवसेनेनेही या आंदोलनात सहभागी व्हावे, अशी गुगली राज यांनी टाकली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News