पंचवीस टन वजन अन्‌  दीड किलोमीटरचे ऍव्हरेज; पाहा महाकाय व्हॅन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019
  • "मिशन रेबीज' व्हॅनची औरंगाबादेत उत्सुकता 
     

औरंगाबाद - जागतिक आरोग्य संघटनेतर्फे शहरे रेबिजमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून "मिशन रेबीज' व्हॅन तयार करण्यात आली आहे. ही व्हॅन शुक्रवारी (ता. दोन) औरंगाबाद महापालिकेत दाखल झाली. व्हॅनचे तब्बल 25 टन वजन असून, लांबी चाळीस फूट, एका लिटर डिझेलला फक्त दीड किलोमीटरचे ऍव्हरेज आहे.

व्हॅनमध्ये सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय, लिफ्ट, सोफा, टीव्ही, किचन अशा सुविधा आहेत. व्हॅनचे अमेरिकेत डिझाईन करण्यात आले आहे. ऍनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया व पशुसंवर्धन मंत्रालयातर्फे नागपूर शहरात मिशन रेबीज व्हॅनद्वारे महिनाभर पशुचिकित्सकांमध्ये शस्त्रक्रियेसंदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. ही "मिशन रेबीज' व्हॅन पुणे येथे जात आहे. त्यापूर्वी औरंगाबाद शहरात काही काळ ही रेबीज व्हॅन थांबली.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News