‘मिशन मंगल’वर वेबसीरिज 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 16 August 2019
  • ‘मिशन मंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला
  • या चित्रपटावर आधारित वेबसीरिज
  • वेबसीरिजची निर्मिती एकता कपूर करणार
  • ‘मिशन ओवर मार्स’ असे या वेबसीरिजचे नाव​

अभिनेता अक्षयकुमार सध्या देशभक्तिपर चित्रपट करण्यात रमला आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्याचा ‘मिशन मंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर कितपत कमाई करणार हे काही दिवसांत स्पष्ट होईलच. पण ‘मिशन मंगल’साठी आणखी एक खुशखबर आहे. आता या चित्रपटावर आधारित वेबसीरिज येणार आहे. या वेबसीरिजची निर्मिती एकता कपूर करणार आहे.

‘मिशन ओवर मार्स’ असे या वेबसीरिजचे नाव आहे. अभिनेत्री साक्षी तनवर, मोना सिंह, निधी सिंह आणि पालोमी घोष हे कलाकार या वेबसीरिजमधून प्रेक्षकांसमोर येतील. या वेबसीरिजमधील महिला कलाकार वैज्ञानिकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News