"या" वेबसिरीजचा दुसरा सिझन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

चार मुलींच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या या वेबसीरिजची कथा अगदी कमी वेळात प्रसिद्धीस आली.

ॲमेझॉन प्राईमची ‘फोर मोअर शॉट्‌स’ ही वेबसीरिज चर्चेचा विषय ठरली. चार मुलींच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या या वेबसीरिजची कथा अगदी कमी वेळात प्रसिद्धीस आली.

या वेबसीरिजचा चाहता वर्ग पाहता याच्या दुसऱ्या भागाची आता घोषणा करण्यात आली आहे. ‘फोर मोअर शॉट्‌स’च्या पहिल्या सीझनमध्ये सयानी गुप्ता, कीर्ती कुल्हारी, बानी जे आणि मानवी गगरु यांनी उत्तम काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता या दुसऱ्या सीझनसाठीही या चौघी पुन्हा एकत्र येणार आहेत. शिवाय काही नवे चेहरेही या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहेत.

नुपूर अस्थाना दिग्दर्शित या मालिकेची कथा देविका भगत यांनी लिहिली आहे. प्रतिक बब्बर, लिसा रे, मिलिंद सोमण यांसारखे कलाकारही या सीरिजच्या दुसऱ्या भागामध्ये दिसणार आहेत. सयानी, कीर्ती, बानी आणि मानवी काय धमाल करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News