वेब सिरीज

सागर गायकवाड
Monday, 1 April 2019

वेब सिरीजची उत्सुकता लोकांमध्ये वाढवता, यानंतर त्या वेब सिरीजचा एक किंवा दोन भाग फ्री मध्ये बघायला देतात, त्यानंतर बाकीचे भाग पैसे देऊन बघावे लागतात. प्रत्येकाला मग असेच वाटते ना की नंतर काय होणार मग तो ती सिरीज विकत घेणारच, आणि तो पहिला किंवा दुसरा भाग असा बनवतात की लोकांना पुढचा भाग हा बघावा अस वाटतंच, आणि मग आपण बाकीचे भाग विकत घेतोच, आणि अश्या प्रकारे एका वेब सिरीज वर ते किती पैसे कमवतात. वाचा आणि विचार करा.

आता साध्य वेब सिरीज, ट्रेंड चालू आहे.  प्रेक्षक आता चित्रपट पाहण्यापेक्षा वेब सिरीज बगण्यात रस दाखवत आहेत. आतापर्यंत अश्या अनेक वेब सिरीज येऊन गेल्या आहेत. आतापर्यंत एकही वेब सिरीज फोल्प झाली नाही आहे.  वेब सिरीज का बनवल्या जातात हे तुमच्या लक्षात कधी आले आहेत का?, मागच्या काळात चित्रपटानंपेक्षा जास्त वेब सिरीज निघाल्या आहेत यांवर कोणी लक्ष दिले आहे का, आता सर्व निर्देशक, प्रोड्युसर , सर्व अभिनेते  वेब सिरीज मध्ये काम करत आहेत. काही तरी फायदा असेल म्हणून ना, नाही मी अस नाही म्हणत की त्यानी आपला फायदा नाही बघितला पाहिजे. सर्वाना तो अधिकार आहे. पण आपणही वेब सिरीज बाघताना थोडा विचार केला पाहिजे. 

वेब सिरीज या भागनुसार बनविल्या जातात अर्थातच सिरीज म्हंटल  की भागानुसारचं असणार, आणि वेब सिरीज काही कोणत्या चित्रपटगृहात प्रदर्शित केल्या जात नाही. वेब सिरीज या एखादया वेब वर किंवा चॅनेल अँप वर प्रदर्शित केल्या जातात, ही माहिती तर सर्वांना माहीत असेलचं. कधी विचार केला आहे, असे का?  चित्रपटचं कसं असत ते चित्रपटगृहात प्रदर्शित होतात मग आपण तिकीट घेऊन ते पाहतो. वेब सिरीजचं तस नाही तुम्हाला प्रत्येक भाग बघण्यासाठी तो भाग विकत घ्यावा लागतो.

आता प्रत्येक भागाची किंमत वेगळी असते. प्रत्येक भाग हा 99 रुपये किंवा 149 रूपयांचा असतो मग विचार करा असे 10 भाग जर एखादया सिरीज चे असतील तर तुम्ही विचार करा मग एक वेब सिरीज बघायला आपण किती पैसे घालवतो. काही काही सिरीज या असतात स्वस्त पण काही काही हा सर्वच नाही ना! आणि या सर्व वेब सिरीज वेब वर किंवा चॅनेल अँप वर पाहू शकतो. त्यासाठी अगोदर आपल्याला त्या वेबचे किंवा त्या चॅनेल अँपचा 199 रुपये महिन्याचा  किंवा  999 रुपये असा वर्षभराचा प्राइम रिचार्जे करावा लागतो, त्यानंतर वेब सिरीज  बघायची आहे, त्या सिरीज चे वेगळे पैसे दयावे लागते.  इतके ही करून ती वेब सिरीज पाहण्यासाठी नेट रिचार्जे ही करवा लागतो. संपूर्ण प्रोसेस आहे एक वेब सिरीज पाहण्यासाठी, मग विचार करा एक वेब सिरीज पाहण्यासाठी किती पैसे गेले. लोक विचार करतात की हे सर्व एकमेकांशी थोडी जुडलेले असतील पण असे नाही आहे, हे सर्व एकमेकांशी जुडलेले आहेत.

वेब सिरीज काढणाऱ्यांची नियोजन मला खूप आवडते. सर्व प्रथम ते त्या वेब सिरीजचा ट्रेलर यु ट्यूब वर प्रकाशित करतात, त्या वेब सिरीजची उत्सुकता लोकांमध्ये वाढवता, यानंतर त्या वेब सिरीजचा एक किंवा दोन भाग फ्री मध्ये बघायला देतात, त्यानंतर बाकीचे भाग पैसे देऊन बघावे लागतात. प्रत्येकाला मग असेच वाटते ना की नंतर काय होणार मग तो ती सिरीज विकत घेणारच, आणि तो पहिला किंवा दुसरा भाग असा बनवतात की लोकांना पुढचा भाग हा बघावा अस वाटतंच, आणि मग आपण बाकीचे भाग विकत घेतोच, आणि अश्या प्रकारे एका वेब सिरीज वर ते किती पैसे कमवतात. वाचा आणि विचार करा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News