आम्ही हिंदूत्वासाठीचं काम करणार: शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

संदीप काळे
Saturday, 21 September 2019

अनेक वर्षे शिवसेनेचा बालेकील्ला असलेला औरंगाबाद जिल्हा आता एमआयएम पक्षाने जिंकला आहे. शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे हे सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. सकाळ माध्यम समूहाच्या "महाराष्ट्र दौऱ्यात" संदीप काळे यांनी त्यांची घेतलेली विशेष मुलाखत.

 

निवडणुकीचे काय नियोजन?
समजा युती झाली नाही तर शिवसेनेच्या 288 जागा लढवण्याची तयारी आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिक विमा आदी प्रश्न सोडवणे आमच्यासाठी अग्रस्थानी आहे. जनतेला हवा असलेला महाराष्ट्र निर्माण करण्याचं काम सध्या सुरु आहे. आम्ही हिंदूत्ववादी आहोत हिंदूत्वासाठीचं काम करणार आहेत. विकास, संरक्षण आणि मदत या तीन विषयावर काम करण्याचा अधिक भर आहे.

कोणत्या गोष्टीमुळे तुमचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला?
वंचित बहूजन आघाडी अणि बंडखोरी यामुळे माझा पराभव झाला. या पराभवाला खचून न जाता आम्ही पुन्हा नविन जोमाने कामाला लागलो आहे. मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकील्ला आहे तो कायम शाबूत ठेवण्याचा प्रयत्न आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील विकास करतील का?
आमदार असताना जलील यांनी कोणताही विकास केला नाही आणि मी खासदार असताना जेवढा विकास केला तेवढा विकास जलील करु शकणार नाहीत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला मानवंदना देण्यासाठी ते उपस्थीत राहू शकले नाही हा हुतात्मांचा अपमान आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News