इनोव्हेशनचे केंद्र बनवू - कुलगुरु डॉ. येवलेंची ग्वाही

अतुल पाटील
Tuesday, 16 July 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु म्हणून काम करण्याची संधी मिळतेय, याचा आनंद सर्वोच्च आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु म्हणून काम करण्याची संधी मिळतेय, याचा आनंद सर्वोच्च आहे. हे विद्यापीठ केवळ पदवी देणारे विद्यापीठ न राहता इनोव्हेशनचे प्रमुख केंद्र बनेल. अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे नवनियुक्‍त कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी "सकाळ'ला दिली. 

बाबासाहेबांच्या दिक्षाभूमीकडून शिक्षाभूमीकडे येताना मनस्वी आनंद होतोय. अशी प्रतिक्रिया देताना डॉ. येवले म्हणाले, "राज्यपालसी विद्यासागर राव यांनी राज्यातील एका जुन्या विद्यापीठाचा कुलगुरु होण्याचा मान दिला. त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. त्यांच्या विश्‍वासाला पुरेपुर उतरेन. या विद्यापीठात शिक्षण घेणारा विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कणखरपणे उभा रहावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. विद्यापीठातील संशोधनाला प्राधान्य राहील. तसेच प्रशासनाची घडी बसवण्यासाठी काही निर्णय तत्काळ घेण्यात येतील.'' 

"विद्यापीठाचा नावलौकिक वाढविताना हे विद्यापीठ आता केवळ पदवी देणारे केंद्र राहणार नाही तर, याची ओळख इनोव्हेशनचे केंद्र अशी केली जाईल. कौशल्याधिष्ठित आणि रोजगारक्षम विद्यार्थी घडवणे हेच मोठे आवाहन आहे. यासाठी परीक्षा, अभ्यासक्रम यात सुधारणा करुन विद्यापीठाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्यात येईल.'' अशी ग्वाही डॉ. येवले यांनी दिली.

दभार आजच स्विकारणार 
राज्यपाल भवनाकडून सोमवारी (ता. 15) नियुक्‍तीचे पत्र मिळाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची सुत्रे मंगळवारी (ता. 16) सकाळी साडे दहा वाजता स्विकारणार आहेत. अशी माहिती डॉ. येवले यांनी दिली. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News