आम्हाला मतदानाचा हक्क आहे; आम्ही बजावणारच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 April 2019

मतदान हा तुमचा हक्क आहे; पण त्याबरोबरच तुमचे पालक, मित्र यांनादेखील मतदानासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. 

‘सकाळ’च्या ‘आय विल वोट’ला उत्स्फुर्त प्रतिसाद, विद्यार्थ्यांनी घेतली मतदान करण्याची शपथ -
 
अकोला- लोकशाहीचे भवितव्य आणि पाइक आम्ही आहोत. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असेल, तर त्यापासून आम्ही दूर राहणार नाही. केवळ आम्ही स्वत:च नाही, तर आमचे पालक आणि मित्रांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करू, असा निश्‍चय सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला. सकाळ माध्यम समूह आणि सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्याल यांनी संयुक्तपणे नवमतदार जागृती महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. ‘सकाळ’च्या ‘आय विल व्होट’ या उपक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांनी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली. या वेळी महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रसन्नजित गवई आणि प्राध्यपक उपस्थित होते. 

मतदान हा तुमचा हक्क आहे; पण त्याबरोबरच तुमचे पालक, मित्र यांनादेखील मतदानासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. 
- प्राचार्य, सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला. 

मतदान हे सर्व नागरिकांचे राष्ट्रीय व निस्वार्थ कर्तव्य आहे. प्रलोभनास बळी न पडता योग्य त्या उमेदवारास मतदान करून आपला हक्क बजवावा. 
- डॉ.प्रसन्नजित गवई, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला. 

‘सकाळ’च्या ‘आय विल वोट’ला उत्स्फुर्त प्रतिसाद-

जगातल्या सर्वात माेठ्या लाेकशाहीची सार्वत्रिक निवडणकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सर्वांचेच लक्ष याकडे लागलेले आहे. भारतात येत्या काळात काेणाचे सरकार येणार हे या निवडणुकांमधून स्पष्ट हाेणार आहे. भाजपा, काॅंग्रेस आणि इतर पक्ष हे विविध मुद्दे घेऊन नागरिकांसमाेर येत आहेत. या निवडणुकांबाबत तरुणांना काय वाटतं, तसेच पहिल्यांदा मतदानकरणाऱ्या तरुणांना कुठले मुद्दे निवडणुकीत महत्त्वाचे वाटतात याचा सकाळने शहरातील सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आढावा घेतला. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना सध्या शिक्षण, वाढती बरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, चुकीचे आयात निर्यात धोरणं, औद्योगिक विषय यासह मलभुत सोईसुविधा आदी समस्या भेडसावत असल्याचे दिसून येतोय. यावर तोडगा काढून प्रत्येक तरूणाच्या हाताला काम देणारी व्यवस्था सरकारने निर्माण करण्याचाी आज गरज असल्याचे तरूणांनी सांगितले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News