खोतकरांसोबत असलेल्या वाद हा आमचा एक प्लॅन होता ; रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • लोकसभा निवडणुकी विजयी झाल्यानंतर भाजपाचे  खासदार आता काय व्यक्तयत्व करतील याचा आता काय नेम राहिला नाही. 
  • असच एक खळबळजनक वक्त्यत्व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
  • जालना लोकसभा  मतदार संघातील  रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर या दोघांमधील वाद मोठा चर्चेत होता.​

जालना: लोकसभा निवडणुकी विजयी झाल्यानंतर भाजपाचे  खासदार आता काय व्यक्तयत्व करतील याचा आता काय नेम राहिला नाही. असच एक खळबळजनक वक्त्यत्व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी केले आहे.  दानवे म्हणाले की, शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि मी अगोदरच सेटलमेंट केली होती. आम्ही फक्त नाटक करत होतो, असे खळबळजनक वक्त्यत्व दानवेंनी एका सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात केले. 

जालना लोकसभा  मतदार संघातील  रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर या दोघांमधील वाद मोठा चर्चेत होता. या वादामुळे कुठेतरी भाजपा आणि शिवसेनेमध्ये तणाव वाढत आहे असे दिसून येत होतो, दोघांचा हा वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केली आणि हा वाद मिटवला. पण वाद केवळ दिखावा होता यात काही सत्य नव्हते असे दानवे म्हणाले.  अर्जुन खोतकर यांनी हे नाटक उत्तम केले. आम्ही दोन महिन्यापूर्वीच सर्व नियोजन केले होते. असे खळबळजनक वक्त्यत्व त्यांनी केले आणि मुख्य म्हणजे दानवे हे सर्व बोलत होते, त्यावेळेस त्यांच्या सोबत  अर्जुन खोतकर त्यांच्यासोबत होते. 

रावसाहेब दानवे यांच्या हाती यश आहे, म्हणून ते आजपर्यंत एकही निवडणूक हारले नाही, मी स्वतः अमित शाह याना बोलणार आहे की, विधानसभेतही रावसाहेब दानवेच यांनाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहू द्या, असे अर्जुन खोतकर म्हणाले, यावरूनच स्पष्ट होत आहे की, हे सर्व नाटकच होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News