आम्ही आरक्षणाविरोधात नाही

प्रिया साबळे
Monday, 28 January 2019

गंमत आहे ना? २०१७ साली, शास्त्रज्ञ असलेल्या 'सोहळ्यातल्या' कुणा ब्राह्मण बाईला आपल्या घरी स्वयंपाक करणार्‍या परजातीच्या बाईचा 'विटाळ' आहे तर कुणाला आपल्या जातीतील कलावंताने घरात बसवलेल्या थेट 'गणपती'चाच विटाळ आहे. अशावेळी सोशल मिडीयावर वाद सुरू होतात. आणि या वादात वरील कशातही आजीबात टोकाची भूमिका न घेणार्‍या एका जातीला सतत टारगेट केले जाते, डिवचले जाते आणि हा समाज संख्येने आणि ताकदीने प्रचंड बलवान असून आपल्या अभूतपूर्व संयमाने तमाम मराठी माणसासमोर एकेक आदर्श निर्माण करत आहे.

गंमत आहे ना? २०१७ साली, शास्त्रज्ञ असलेल्या 'सोहळ्यातल्या' कुणा ब्राह्मण बाईला आपल्या घरी स्वयंपाक करणार्‍या परजातीच्या बाईचा 'विटाळ' आहे तर कुणाला आपल्या जातीतील कलावंताने घरात बसवलेल्या थेट 'गणपती'चाच विटाळ आहे. अशावेळी सोशल मिडीयावर वाद सुरू होतात. आणि या वादात वरील कशातही आजीबात टोकाची भूमिका न घेणार्‍या एका जातीला सतत टारगेट केले जाते, डिवचले जाते आणि हा समाज संख्येने आणि ताकदीने प्रचंड बलवान असून आपल्या अभूतपूर्व संयमाने तमाम मराठी माणसासमोर एकेक आदर्श निर्माण करत आहे.

जगात यापूर्वी कधीही झाले नसेल असे संयमी आंदोलन या समाजाने केले. आपल्या मागण्यांसाठी तब्बल ५८ मूकमोर्चे काढून ते यशस्वी करून दाखवले. कुठेही शिवीगाळ नाही, कुणाला मारहाण नाही, अस्वच्छता नाही, दूसर्‍या जातींना दूषणं नाहीत.या मोर्चाच्या अग्रभागी या समाजातील मुली होत्या हे दूसरे वैशिष्ठ्य! या मुलींच्या भाषणांवर काही समाजकंटकांनी टीका केल्या "बोलक्या बाहुल्या", "पढवलेल्या मुली, यांना घरात काय किंमत असते माहितीये आम्हाला." वगैरे वगैरे...!

पण त्याचवेळी याच समाजातून ललिता बाबरसारखी मुलगी  आँलिंपिक्समध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी जाऊन आली होती. तिला याच समाजात बढावा- प्रोत्साहन मिळाले होते. यावर मात्र हे तथाकथित समाजसुधारक मूग गिळून गप्प होते! याच समाजात शहिद संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक हिला सैन्यात भरती होऊन- लेफ्टनंट पद मिळवून देशाचे रक्षण करण्यापर्यन्त बढावा दिला जातो- बळ दिले जाते! त्यावेळी हे टीकाकार मात्र बिळात लपून बसतात...

हाच समाज या टीकाकारांचा 'अन्नदाता'ही आहे, हे सोयिस्कररित्या विसरले जाते. या समाजातील बहुतांश लोक शेतकरी आहेत हे जगजाहीर आहे. त्या आंदोलनावरही टीकेची झोड उठवली 'नमक- हराम' लोकांनी. पण तरीही हा समाज संयम ठेवून आहे.
या समाजात वाईट प्रवृत्ती नाहीतच असे नाही...पण त्यांची झेप शिवराळ कमेन्टस् किंवा पोस्ट करण्यापलीकडे नाही..! या दहा वर्षांत 'खोलेबाई सोवळे प्रकरण' किंवा 'गणपती बसवला म्हणून माफीनामा घेण्यासारखे' एकही प्रकरण या समाजात घडलेले नाही आणि हे अतिशय स्तुत्य- गौरवास्पद आहे! टीकाकारांनी यावरून धडा घेऊन दूसर्‍या समाजाला सतत डिवचण्यापेक्षा त्या समाजात घडणार्‍या चांगल्या, आदर्श गोष्टींपासून बोध घेऊन त्यावरही चर्चा करावी. रक्षण करण्यात जो समाज आघाडीवर आहे. तो समाज अभिमानाने म्हणणारच एवढे मोठे मन नसेल तर किमान आपापल्या घरात डोकावावे...! आपली 'सोवळी' समाजव्यवस्थेला कशी घातक ठरताहेत हे पहावे आणि त्यावर बोलावे.

मित्रांनो, आपला सगळ्यांचा शत्रू कोण आहे हे ओळखा. हे चातुर्वर्ण्य आणि जातीच्या उतरंडी निर्माण करून आपल्यात भांडणे लावून सत्तेचे कुरण चरायला कोण बसलेय ते ओळखा! मराठा मोर्चात कायम सांगीतले जाते की 'आम्ही दूसर्‍या समाजाच्या आरक्षणाविरोधात नाही.' मग दूसर्‍या समाजांनी हे ओळखायला हवे की 'आपल्या आरक्षणाच्या विरोधात कोण आहे? असो..
सीमेवर शत्रूराष्ट्राचा, अतिरेक्यांचा कायम उच्छाद सुरू असतो. त्यात महाराष्ट्रातले जे जवान शहिद होतात त्यातले ९८ टक्के जवान मराठा समाजातले असतात. पोलीस खात्यातही हा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. "एक मराठा - लाख मराठा"

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News