पाण्यावरची गावे बुढतांना...

जयश्री हरि जोशी
Monday, 1 July 2019

ती पाण्यावरची गावे
हलणारे कंदील दूर 
एखादा चंद्र भिजावा

ती पाण्यावरची गावे
हलणारे कंदील दूर 
एखादा चंद्र भिजावा
इतुकेच माधवी सूर...

डोळ्यांत नदीचे काठ
भरलेली धुरकट होडी
अंधार उमलल्यावरती
पाण्यावर डहुळे थोडी...

दुःखाचे घर जरतारी
तू वीज होऊनी येता
मी वाचत नाही राणी
चिरदाह नभाची गाथा...

मी उन्हे ऐलतीराची
पाण्यात बुडवितो आता
प्रतिमेची काय असोशी
तू तमात विरुनी जाता?
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News