वॉटर बलून संस्कृती     

धीरज बालासाहेब पावडे 
Saturday, 26 January 2019

 मुखवटे खूप आकर्षक असतात .पन स्वत्व लपवुन मुखवटा धारण करणे व सतत प्रयत्न की त्याप्रमाणे अभिनय करणे , ही जीवघेणी स्पर्धा सर्वानाच सर्वकाळ जमेल असे नाही. मग अशा बेगडी समाज व्यवस्थेचे धिंडवडे काढणारे, संवेदनशिल व्यक्तीचे अंर्तमन पिळून टाकणारे अनेक प्रसंग घडतात. त्या सर्व प्रसंगाच प्रतिनिधित्व करणारा हा एक प्रसंग.

 मुखवटे खूप आकर्षक असतात .पन स्वत्व लपवुन मुखवटा धारण करणे व सतत प्रयत्न की त्याप्रमाणे अभिनय करणे , ही जीवघेणी स्पर्धा सर्वानाच सर्वकाळ जमेल असे नाही. मग अशा बेगडी समाज व्यवस्थेचे धिंडवडे काढणारे, संवेदनशिल व्यक्तीचे अंर्तमन पिळून टाकणारे अनेक प्रसंग घडतात. त्या सर्व प्रसंगाच प्रतिनिधित्व करणारा हा एक प्रसंग.

एक पाच वर्ष वयाची मुलगी व सात वर्ष वयाचा तिचा भाऊ एका गृहस्था सोबत किराणा दुकानात आले . जे त्यांचे काका होते . त्यांना दुकानातुन एक पाव दुध घ्यायचे होते जे १२.५० रुपयाचे झाले. ते पैसे त्यांनी दुकानदारास दिले. इकडे हा मुलगा दुकाना मध्ये लागलेल्या विविध वस्तू, चॉकलेट, खेळणे, ब्रेड, बिस्कीट, चिप्स, इत्यादी अनेकानेक गोष्टी पाहुन भारावून गेला. बहीन भाबड्या नजरेने फक्त भावाकडेच पाहतच होती की भावाची नजर कोणत्या वस्तूकडे जात आहे. मुलाच्या हातात २० रु होते. या पैश्याचे आपन काय घ्यावे आणि काय नाही अश्या विचारात त्या मुलाची नजर दुकानातीत सर्वच वस्तूवर फिरवली भरली. मुलीची अवस्था अधिक गोंधलेली. भावाची नजर कुठे जात आहे त्या नजरेचा जनुकाही तीची नजर शोधच घेत होती. दुकानातील ज्या ज्या वस्तूवर मुलाची नजर जात होती त्या एका- एका वस्तू विषयी त्याच्या मनात शेकडो विचार एका क्षणात येवुन जात असतील. हया सर्व वस्तू २० रुपयात घेता आल्या असत्या तर त्या सर्व वस्तू त्याने निश्चितच घेतल्या असत्या. पन...

शेवटी त्याची नजर एका वस्तूवर स्थीरावली ती म्हणजे पाण्याचे फुगे उडवणाऱ्या  प्लास्टिकच्या बाटली वर! ती ही तीतकीच आकर्षक. रंगी बेरंगी पाणी दिसनारी प्लास्टिकची पारदर्शक बाटली. फूगे उडवण्या करीता त्या मध्ये प्लास्टिकचा छिद्रे असलेला पांढऱ्या रंगाचा रॉड, त्या रोडला बाटलीच्या बाहेर पाच पते असणारी हिरव्या रंगाची भिंगरी, आता मुलाला राहवेना त्याचा निश्चय पक्का झाला होता. त्याने स्वतःच्या हाताने दोन बाटल्या घेतल्या. बहीनीच्या नजरेत आता चमक आली होती. काकाने मुलाला विचारले २० पयात दोन बॉटल येतील का? मुलगा निश्चलपने म्हणाला पाच रुपयाची एक आहे. दहा रुपयाच्या दोन होतात आणि दोन कुरकऱ्याचे पूडे दहा रुपयाचे असे म्हणत मुलाने दोन कुरकुऱ्या चे पूडे स्वतः हाताने फाडले. खूप मोठा विजय मिळवला होता त्याने आपल्या अंतर द्वंद्वावर. 

दुकानदार माझी कीराणा यादी पूर्ण करण्यात गुंतला होता पन.त्याचे लक्ष सर्वत्र हाते, मुलीची नजर मुलाच्या हातात असलेल्या रंगीबेरंगी बाटलीकडे आणि कुरककुऱ्याच्या पूडयाकडे मोठया आशेने पाहत होती. काकाने मुलाच्या हातातील एक गुलाबी रंगाचे पाणी असणारी बाटली घेतली आणि मुलीला दिली. मुलाच्या हातामध्ये पिवळ्या रंगाचे पाणी असणारी बाटली होती. पणमुलाला गुलाबी रंगाची बाटली हवी होती, काकाने त्याला समजावुन सांगीतले की त्याच्या जवळ जी बॉटल आहे, त्या मध्ये जास्त पाणी आहे. तीच्या हातात असणा-या बॉटल मध्ये कमी पाणी आहे. मुलाने दोन्ही बॉटल कडे नजर टाकली आणि तो खूष झाला. 

मुलीनेही दोन्ही बॉटल पहिल्या तीला कमी पाणी असनारी बॉटल मिळाली हे तीला समजले पणती शांत राहली. त्या कमीपनातही ती खूप खूश होती, गुलाबी रंगाला पाहुन अणि त्यावर असणाऱ्या भिगरीला फिरवतांना तीच्या चेह-यावरचा आनंद लाख मोलाचा होता. खरा आनंद कशात आहे? कमी पनात की जास्त असण्याची हाव. मी विचारच करत राहलो. ती स्थीर, स्थायी, निश्चल जनु काही मूर्तिमंत आनंद. तो अस्थिर, अस्थायी, चंचल जनु काही मूर्तिमंत विचार. अती विचार ना दु:ख कमी करतो ना आनंदाचा उपभोग घेवू देतो. मुलगी हाताच्या बॉटलची भिंगरी फिरवण्यात गुंग झाली. मुलाचे लक्ष तीच्याकडे गेले. तोही भिंगरी फिरवायला लागला.तसे त्याच्या लक्षात आले की आपल्या भिंगरीला चारच पाते आहे, एक पाते तुटलेले आहे. तेव्हा त्याने एकच आकांत-तांडव केला, मुलीची गुंगी एका क्षणात नष्ट झाली जेव्हा काकाने मुलीच्या हातातली कमी पाणी व पाच पाते असलेली, गुलाबी रंगाची बॉटल घेतली व मुलाला दिली. मुलाची जास्त पाणी व चार पाते असलेली गुलाबी रंगाची बॉटल मुलीला दिली.

सुखाला नजर लागणे म्हणजे काय असते हे मला प्रत्यक्ष अनुभवास आले .मुलगी भावाच्या हातात गेलेल्या बॉटल कडे मग आपल्या हातात आलेल्या बॉटल कडे पाहतच राहली. काय अवस्था झाली असेल त्या मुलीच्या मनाची? करता येईल का मोजाप? लावता येईल का अंदाज त्या एका क्षणला काय आणि किती विचार तिच्या मनात आले असतील? पन... आपल्या हातातील पिवळ्या रंगाच्या बॉटल कडे पाहत त्यावर असण्याऱ्या  भिंगरीच्या एका तुटक्या पात्याकडे पाहत त्या तुटक्या भिंगरीला फिरवत -फिरवत तीने तीचे दुःख ही फिरवले. साशंक का असेना पणती आनंदी वाटत होती . मुलगा गुलाबी रंगाचे पाणी असलेल्या बॉटलच्या भिंगरीचे सर्व पाते ठिक आहेत ना याची खातर जमा करुन झाल्यावर तीला फिरवण्यात गुंग झाला. कुरकूऱ्या चे दोन पूडे अजुन त्याच्याच जवळ होते. काकाने दुकानदाराला आवाज दिला. शेटजी कीती रुपये इाले? शेटजी ने उत्तर दिले पस्तिस रुपये झालेत. काका -एवढे कसे काय? शेटजी -वॉटर बलून बॉटत पंधरा रुपायाची एक आहे. एका बॉटलची भिंगरी तुटलेली आहे म्हणून ती दहा रुपयाला लावली. वॉटर बलून चे पंचविस रुपये व कुरकूऱ्या चे दहा रुपये असे एकुण पस्तिस रुपये झाले. काकाची आर्थीक घडी विस्कळीत झाली. काय करावे हा दत्त प्रश्न काकाच्या समोर उभा राहला. 

बहुतेक त्याच्याकडे पैसे नसावे कारण एक पाव दुधाचे बरोबर १२ रुपये ५० पैसे त्यांनी दुकानदारला दिले होते. शेवटी काकांनीही तिच गोष्ट केली जी सर्वसामाण्यांना सतत कराविच लागते ती म्हणजे तडजोड. त्यांनी मुलाच्या हातातली कमी पाणी व सर्व पाते आलेली गुलाबी बॉटल दुकानदाराला वापस केली. हीशोब जुळला परंतू भूकंप, सुनामी, चक्रिवादळ, प्रलय एकाच वेळी आला, जेव्हा मुलाचा हात मुलीच्या हातातील बॉटल घेण्याकरीता पुढे सरसावला. नशीब ही कसे खेळ खेळतो कोणी सांगू शकत नाही. कमीपनातही आनंद शोधणारी मुलगी, पण हे कमीपन सुध्दा तिच्यापासून हीरावून घेतल गेले. सूरवातीला तीने थोड़ा विरोध केला, परंतु काकाने तीच्या हातातली बॉटल घेवून मुलाला दिली तेव्हा तीचा विरोध मावळला. कपाळाच्या मधोमध आलेली केसांची एक बट दोन बोटाने धरत तीचे डोळे अनेकानेक प्रश्न विचारत होते. कधी काका कडे कधी भावाकडे कधी माझ्याकडे पाहत सूनामिच्या प्रचंड भयानक लाटांना आपल्या पापण्यांच्या मजबूत किणाऱ्या वर अडवण्यात अजुनपर्यत तरी ती यशस्वी झाली होती, पण तीच्या मनाचे काय? तीच्या त्या अवस्थेचे यथार्थ वर्णन करावे एवढे शब्दसामर्थ कोणत्याही शब्दा नक्कीच नसेल. एका क्षणात होत्याचे नव्हते होणे यालाच म्हणतात, काका पैसे देण्यात, भाउ पाते तुटलेली भिंगरी फिरवण्यात गुंग.तीच्या कडे कोण पाहणार? पैसे देवुन झाल्यावर काका दोघांनाही चला म्हणाले, मुलगी जागीच उभी, भावाचे लक्ष बहीनी कडे गेले. त्याने लगेच एक कुरकऱ्या चा पूडा फाडून बहीनीच्या हातात दिला. त्या पूडयाकडे पाहत ती दुकाणाच्या पायऱ्या उतरत होती. जड़ अंतःकरणाला व भावनेला जर खरच किंमत असती तर त्या पायऱ्या नक्किच चकनाचूर झाल्या असत्या. पायऱ्या उतरुन झाल्यावर काकाने सांगीतले "दोघांनी मिळून वॉटर बलून खेळा." तु बलून उडव ही त्या बलून ला फोडेल, पण मुलीचे लक्ष वापस केलेल्या वॉटर बलून बॉटल कडे हाते. शेवटी राहवल नाही बॉटल घेतली व पायऱ्या उतरत त्या मुलीच्या हातात ती बॉटल दिली तेव्हा तीच्या डोळ्यात जो आनंद दिसला तो सूध्दा अवर्णनिय होता. काका, भाउ, बहिन रस्त्याने चालायला लागले पणभावाची नजर पून्हा बहीनीच्या हातातल्या बॉटल कडे गेली...

प्रसंग छोटा आहे पणखूप काही सांगून जानारा. आधुनिक व्हायचे म्हणजे नेमके काय करायचे? रंगी बेरंगी अवास्तव दुनियेत बूडून जायचे की स्वत्व जपायचे? अंधानुकरण करायचे तर कीती आणि कशा- कशाचे? कोणती संस्कृती  रुजवायची आहे आपल्याला? ही वॉटर बलून ची? जी वाऱ्या बरोबर कुठे वाहत जाईल माहीत नाही. आणि कुठवर टिकेल माहीत नाही. क्षणीक आनंदाला किती महत्त्व दयायचे? पैशाचा आणि आनंदाचा काही संबंध असतो असे मला नाही वाटत. मी लहान असताना ज्या जिल्हा परिषद शाळेत होतो त्या शाळेला लागूनच एक मस्जिद होती. मस्जिदच्या भिंतीला लागूनच एक रिठ्याचे झाड होते. आम्ही मित्र मस्जिदच्या भिंतीवरून त्या झाडावर चढायचो आणि खूप रिठ्या तोडायचो. त्या वाळवून फोडून एखाद्या ताब्यात पाणी घेवून त्यात काही रिठ्या टाकून तापवायचो. तूराटीची रवी करुन पाण्याला फेस आल्यावर ताराच्या आकड्याच्या साहयाने पाण्याचे फुगे उडवायचो. असे अनेक खेळ आम्ही खेळलो. अमर्याद आनंद लुटला पणकधी पैश्याचा आणि आमच्या आनंदाचा दूर -दूर पर्यंत कधीच संबंध आला नाही. आज सुखाचे, आनंदाचे सुध्दा मार्केटिंग झाले. हजारो रुपयाचे खेळणे घरात असून सूध्दा एकतर खेळायला मित्र नाही, दूसरे महागाचे खेळणे मुलाला खेळायला दिले तर तो तोडतो ही भीती म्हणून फक्त शोकेस ची शोभा वाढवायची. ही वॉटर बलून संस्कृती  आहे. मग आता तुम्हीच ठरवायचे आहे कोणती संस्कृती  योग्य आहे पाण्याचे फुगे की वॉटर बलून संस्कृती

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News