टिक टॉक व्हिडिओसाठी युवकांची स्टंटबाजी पाहा व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019
  • शेगाव जवळच्या पूर्णा नदीवरील प्रकर 

बुलडाणा: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या टिक टॉकचा बोलबाला आहे. टिक टॉकचा व्हिडिओ बनवणारा एक तरी व्यक्ती प्रत्येक घरात असून त्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. फेसबुक, व्हाट्सअॅप आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अॅपनंतर आता सर्वांना टिक टॉकचे वेड लागले आहे. 

लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच याचे वेड लागले आहे. कोणतीही गोष्ट प्रमाणात करणे योग्य मात्र त्याचा अतिरेक झाला की धोका उद्भवण्याची शक्यता असते. असंच काहीसं शेगाव तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या पुलावर होतांना दिसत आहे.

या ठिकाणी काही तरुण स्टंटबाजी करत टिक टॉक व्हिडिओ शूट करण्याच्या नादात पुलावरून पूर असलेल्या नदीत उड्या घेतांना दिसत आहे. हा प्रकार या युवकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News