या ठरल्या पहिल्या महिला दलित गृहमंत्री

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019
  • वाय. एस. जगमोहन रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात मिळाले स्थान

नवी दिल्ली : आंध्र प्रदेश राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसचा विजय झाला. त्यानंतर वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष वाय. एस. जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्त्वात सरकार सत्तेवर आले. रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात दलित महिला मेकाथोटी सुचारिता यांच्याकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

मेकाथोटी सुचारिता या प्रथिपाडू विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. प्रथिपाडू हा मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत. आता त्यांची राज्याच्या गृहमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे.

वाय. एस. जगमोहन रेड्डी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी काल (शनिवार) पार पडला. त्यावेळी सुचारिता यांच्यासह 24 जणांना राज्यपाल ई. एस. एल. नरसिंह यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर आज जगमोहन रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खातेवाटप झाले. यामध्ये सुचारिता यांना गृहमंत्रिपद देण्यात आले.  

दरम्यान, सुचारिता यांची राज्याच्या गृहमंत्रिपदावर निवड झाल्याने त्यांच्या रूपाने राज्याला पहिल्यांदा दलित समाजातील गृहमंत्री मिळाला आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News