वारकऱ्यांच्या वाहनांना एकादशीच्या काळात टोलमाफी द्या : पहा ह्या नेत्याने केली मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019
  • १२ जुलैला येणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
  • वारकऱ्यांच्या वाहनांना एकादशीच्या काळात टोलमाफी देण्याची मागणी शेवाळे यांनी केली आहे. 

मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी द्यावी, अशी मागणी दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आषाढी एकादशीसाठी विठू माउलीच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्यभरातून हजारो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. यंदाही १२ जुलैला येणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. या वारकऱ्यांच्या वाहनांना एकादशीच्या काळात टोलमाफी देण्याची मागणी शेवाळे यांनी केली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News