वर्धा जिल्ह्यात ४० विद्यार्थी थोडक्यात वाचले; बस कलंडली

सिद्धांत भगत, वर्धा
Friday, 2 August 2019

आष्टी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत असलेली बस रस्त्याच्या काठावरून कलंडल्याची घटना बुधवारी (दि. ३१) दुपारी १२ च्या सुमारास घडली

तळेगाव - वर्धा जिल्ह्यातील तळेगाव-आष्टी या राष्ट्रीय महामार्गावरून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रस्त्याच्या काठावरून कलंडल्याची घटना बुधवारी दि. ३१रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली. या बसमध्ये असलेले ४० विद्यार्थी थोडक्यात वाचले आहेत.

सकाळी ११ वाजता वरूड डेपोची बस आर्वी येथून वरूडकडे जाण्यासाठी निघाली. रस्त्याच्या बाजूला वळणमार्ग तयार केला होता. त्यावर मुरूमही टाकलेला होता. या मुरुमाची योग्य रितीने दबाई न केल्याने बस त्यावरून जाताच कलंडली व तेथील दलदलीत अडकली.

बस कलंडल्याचे लक्षात येताच वाहन चालकाने विद्यार्थ्यांना तात्काळ खाली उतरविले व मिळेल त्या वाहनाने वरुडकडे रवाना केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News