घर पाहिजेयं? आता सरकारला करा अर्ज आणि मिळवा घर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 29 July 2019

 हे ऑनलाइन सर्व्हेक्षण केंद्रीय आवास आणि नगरविकास मंत्रालयाच्या निर्देशावरुन सुरु करण्यात आलं आहे. पंतप्रधान आवास योजनेचा लाभही अशा यादीतील लोकांना मिळणार आहे

नवी दिल्ली : आयुष्यात प्रत्येकाला स्वतःच घर पाहिजे असतं. यासाठी आता सरकारने पुढाकार घेतला आहे. दिल्ली शहरात एका वेगळ्या पद्धतीचे सर्वेक्षण होत आहे. ज्यांना स्वतःच घर नाही त्यांना घर देण्याचा विचार सरकार करत आहे. अनेकदा घर मनासारखं मिळत नाही. अशा लोकांची यादी सरकारकडून बनविण्यात येणार आहे. त्यामुळे जर भविष्यात सरकारकडून एखाद्या घरांची योजना आल्यास या लोकांना घरे देण्यात प्राधान्य मिळणार आहे.  

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दिल्लीतील घर नसलेल्या लोकांसाठी दिल्ली विकास प्राधिकरण (डीडीए) अंतर्गत हे राबविण्यात येणार आहे. दिल्ली सरकार जे सर्वेक्षण करत आहे, ते ऑनलाईन असणार आहे.  हे ऑनलाइन सर्व्हेक्षण केंद्रीय आवास आणि नगरविकास मंत्रालयाच्या निर्देशावरुन सुरु करण्यात आलं आहे. पंतप्रधान आवास योजनेचा लाभही अशा यादीतील लोकांना मिळणार आहे.  

www.dda.org.in या वेबसाईटवर संबंधित नागरिकांकडून याबाबत अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज भरुन जवळच्या सेतू कार्यालयात जमा करण्यास सांगितले आहे. डीडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या डीडीएकडून घर नसलेल्या लोकांचा डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरपर्यंत या वेबसाईटवर अर्ज मिळतील. दोन महिन्याच्या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांची यादी बनविण्यात येणार आहे. ज्या लोकांकडे स्वतःचे घर नाही, त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News