अमेरिकेत जायचंय? तर सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती द्या..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

जगातील प्रत्येक व्यक्तीला अमेरिकावारी करायची असते. सुरुवातीपासूनच परदेशात जायचं म्हणजे अमेरिकेत जायचं हे एक समीकरणच झालं आहे. मात्र अमेरिकेत जायचं तर व्हिसा हा आलाच..! "अमेरिका वारी" च स्वप्न पाहणाऱ्यांना आता व्हिसा मिळविण्यासाठी नव्या नियमांचा सामना करावा लागणार आहे.

व्हिसा मिळविण्यासाठी अमेरिकेने एक नवी अट केली आहे.  अमेरिकेत व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या सगळ्यांना आता आपली सोशल मीडियाची माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये सोशल मीडियावर वापरात येणारे नाव,  पाच वर्ष वापरात असलेला फोन नंबर, ईमेल आयडी याबाबत सविस्तर माहिती देणं बंधनकारक आहे. 

जगभरातून दरवर्षी जवळपास कोटींच्या घरात लोकं व्हिसासाठी अर्ज करतात. त्यामुळे " इतर देशातील लोकांना इथे प्रवास करण्याची आम्ही परवानगी देतो. पण अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो," असं प्रशासनाने म्हटलं आहे.
सुरुवातीला फक्त काही लोकांनाच आपल्या सोशल मीडियाबाबत माहिती पुरवणे बंधनकारक  होते,मात्र आता सर्व अर्जदारांना सोशल मीडियावरची त्यांची खाती आणि अन्य वेबसाईट्स, ज्यांचा उल्लेख अर्जात नसेल, त्यांची माहिती द्यावी लागणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News