नातं जोडायची नीती हवी..!

डॉ. लीला पाटील
Friday, 14 June 2019

एकत्र कुटुंब पद्धतीचे विघटन व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे समझोता, समायोजन, समजून घेणे कठीण होत निघालंय. त्यामुळे नातं काय असतं? त्याचे महत्त्व काय? त्याची जोडून ठेवण्याची गरज आज समजेनाशी झाली आहे. कारण कौटुंबिक सुख-समाधानाची संकल्पनाच कालबाह्य होत निघाली असून स्वत:मध्येच रमणं आणि आत्ममग्नतेचीच स्थिती बहुसंख्य कुटुंबांमध्ये दिसत आहे. दुसऱ्यासाठी झटणं, त्याग करावा लागणं, वर्तन हे ‘शेअरिग आणि केअरिंग’ या नीतीला धरून आहे, असे दिसेनासे झाले आहे. 

मानसिक रुक्षता, भावनिक ताठरपणासुद्धा दिसतो कृतीतून, नात्याचा गोडवा राखण्याचं भान नाहीच व गरजही वाटत नाही. पोषाखही जणू साजेसा... तो तर उच्चशिक्षित पिढी वाकेना! नमस्कारासाठी खाली झुकेना! कौटुंबिक शिष्टाचार व पारंपरिक संस्कृतीचे संस्कार हेच जुनाट, कालबाह्य, टाकाऊ मानून भिरकावून देण्याची आजची नीती ही नात्यांची ओळख जाण व मान कशी राखतील? नात्याचा गोडवा अनुभवणं तर दुरापास्तच. टीव्हीचा पगडा, मोबाईलचं व्यसन, इलेक्‍ट्रॉनिक माध्यम साधनांची जवळीक व जबरदस्त ओढ वापरायची ही स्थिती माणसाला माणसापासून दुरावत नेत आहे.

एकमेकांबद्दल ओढ, परस्परांविषयी प्रेम, सहसंबंधात विश्‍वास अव्यक्त ठेवण्याचं झपाटलेपण आणत आहे. नात्याची नीती, प्रीती सांभाळण्यातील आजचा हा जबरदस्त अडसर ठरत आहे. भावनेचा ओलावा विचार व्यक्त करणं, समोरासमोर राहून, बोलून, भेटून, डोळे भिडवून व्यक्त होणं होईनासं झालं आहे. पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण, प्रतिष्ठेच्या, चैनी चंगळवादी समजुती, अश्‍लील दृश्‍ये व गाणी, दहशतवाद यांचा धुमाकूळ असलेले सिनेमे पाहण्यावर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे मेंदू बधिर, भावना बोथट, तर नात्यांमधील आत्मीयतेची भावना लयास जात आहे. 

आज नव्याने भारतीय महान संस्कृतीचे स्मरण करायला हवे. त्यांची शिकवण, नीतीमूल्यांचा कास, संस्कृतीचे अनुकरण केले. पालक, शिक्षक, समाजसुधारक, तत्त्वज्ञानी, प्रवचनकार, कीर्तनकार मीडिया यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलायला हवी. 

अजूनही खुलेपणा, माणुसकी जोपासणारी व्यक्तिमत्त्वे, कुटुंबे समाजात आहेत. दुर्योधन नीती रोखायची असेल, तर युधिष्टिर तत्त्वनिष्ठा आणि कृतिशील वर्तनातून समाजासमोर प्रकर्षाने यायला हवी. जोडायची नीती हवी, तोडायची नकोच.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News