प्रतिक्षा संपली; दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

बारावीचा निकाल लागल्यापासून दहावीच्या निकालाची प्रतिक्षा सुरू झाली होती. निकाल आज लागणार उद्या येणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली सोशल मीडियावर तारखा पडू लागल्यामुळे अनेकजण बुचकाळ्यात पडले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल 8 जूनला लागणार असल्याचे जाहीर केल्यामुळे सर्व चर्चेला पूर्णविराम मिळला आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०१९ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षा निकाल ८ जूनला दुपारी १ वाजता लावणार असल्याचे कळवण्यात आले आहे. गेल्यावर्षी दहावीचा निकाल ८ जून रोजी लागला होता. 

निकालाची ६ जून तारीख सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विद्यार्थी आणि पालकांनी त्यावर विश्वास ठेवून शाळा आणि बोर्डाकडे विचारणा करायला सुरुवात केली. परंतु या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्टीकरण राज्य शिक्षण मंडळाने दिले होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News